Join us  

Robin Uthappa Shivam Dube IPL 2022 CSK vs RCB Live Updates : 17 Six, 12 Fours!; रॉबिन उथप्पा, शिवम दुबे यांची विक्रमी कामगिरी, बंगळुरूच्या गोलंदाजांना बदडले

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 9:24 PM

Open in App

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. 2 बाद 36 अशा अवस्थेत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या मदतीला रॉबिन उथप्पा व  शिवम दुबे ( Robin Uthappa Shivam Dube ) ही जोडी धावून आली. या दोघांनी 74 चेंडूंत 165 धावांची भागीदारी केली. 150 ते 200 हा पल्ला गाठण्यासाठी उथप्पा व दुबे यांना केवळ 14 चेंडू खेळावे लागले. पण, दोघांनाही शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 

ऋतुराज आज चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु अम्पायर कॉल असल्यामुळे त्याला 17 धावांवर LBW होऊन माघारी जावे लागले. RCBकडून पदार्पण करणाऱ्या जोश हेझवूडने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मोईन अली ( 3) धावबाद झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी 52 चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. दुबेने 31, तर रॉबिनने 32 चेंडूंत अर्धशतक झळकावले. या दोघांनी 11-15 या पाच षटकांत 73 धावा कुटल्या. 45 चेंडूं 81 धावांवर असताना उथप्पाला जीवदान मिळाले, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला गेला, पंरतु सिराजचा तो चेंडू No Ball ठरला अन् RCBच्या आनंद क्षणिक ठरला. सिराजने टाकलेल्या 17व्य षटकात 18 धावा चोपल्या गेल्या. उथप्पा व दुबे यांची फटकेबाजी पाहून RCBच्या खेळाडूंचे खच्चिकरण झालेले पाहायला मिळाले. 18व्या षटकात आकाश दीपने टाकलेला चेंडू हवेत उंचावला, परंतु तो टिपण्यासाठी RCBची तीन खेळाडू पळाले. मात्र एकालाही तो टिपता आला नाही. तू-मी च्या नादात उथप्पा व दुबेने दोन धावा पळून काढल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली.. आयपीएल 2022मधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. RCB विरुद्धचीही तिसऱ्या विकेटसाठीही सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी केन विलियम्सन व मनीष पांडे यांनी 2018मध्ये 135 धावा चोपल्या होत्या. 

आकाश दीपने 18वे षटक पूर्ण करण्यासाठी 10 चेंडू फेकले. आयपीएल इतिहासातील हे सर्वात मोठे षटक ठरले. त्याने चार वाईड चेंडू टाकले, तर अन्य सहा चेंडूंत 6,4,2,6,1,1 अशा धाव आल्या. आकाश दीपने 4 षटकांत 58 धावा दिल्या. 19व्या षटकात ही भागीदारी तुटली. उथप्पा 50 चेंडूंत 4 चौकार व 9 षटकारांसह 89 धावांवर बाद झाला. वनिंदू हसरंगाच्या त्याच षटकात सलग दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजा ( 0) मोठी फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. 20व्या षटकात दुबेने पहिलाच चेंडू Sixer खेचला.

शतकासाठी 6 धावा हव्या असताना दुबेने खणखणीत फटका मारला, तो टिपण्यासाठी फॅफ  ड्यु प्लेसिक पुढे आला, परंतु त्याने झेल सोडला. दुबे 46 चेंडूंत 5 चौकार व 8 षटकारांसह 95 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने 4 बाद 216 धावा केल्या. दुबे व उथप्पा यांची 165 धावांची भागीदारी ही आयपीएलमधील तिसऱ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी कुमार संगकारा व कॅमेरून व्हाईट यांची 2012साली नोंदवलेली 157 धावांचा विक्रम मोडला. 

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App