Join us  

Harshal Patel Out, IPL 2022 CSK vs RCB Live Updates: RCBने नाणेफेक जिंकली, संघात हर्षल पटेलच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी

IPL 2022 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates: गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK)  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ पर्वात अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 7:28 PM

Open in App

IPL 2022 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates: गतविजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK)  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ पर्वात अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आज त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) आव्हान आहे. सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली (MS Dhoni vs Virat Kohli) यांच्यातली टशन पाहायला मिळणार आहे. गतविजेत्यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचा आहे. तरीही CSK ने संघात एकही बदल केलेला नाही. बंगळुरूच्या संघाने मात्र हर्षल पटेलच्या जागी संघात सुयश प्रभूदेसाईला संधी दिली.

आजचा सामना CSK साठी खास आहे, कारण आयपीएलमधील CSKचा हा 200 वा सामना आहे आणि मुंबई इंडियन्स, RCB, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यानंतर असा पराक्रम करणारा हा सहावा संघ ठरलाय. ( Chennai Super Kings will be the sixth team to play 200 IPL matches after MI, RCB, KKR, DC & PBKS.) CSKने 199 सामन्यांपैकी 117 मध्ये विजय मिळवले आहेत, तर 80 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. RCBच्या ताप्यात आज दोन बदल करण्यात आले असून जोश हेझलवूड हा CSKचा माजी गोलंदाज त्यांच्याकडून पदार्पण करतोय. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ- फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज, दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, सुयश प्रभूदेसाई, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप

चेन्नई सुपर किंग्ज संघ- रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, ख्रिस जॉर्डन, तिक्षणा

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App