IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर १३ धावांनी विजय मिळवला. RCB च्या ८ बाद १७३ धावांच्या प्रत्युत्तरात CSK ला ८ बाद १६० धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेलने अनपेक्षितपणे दिलेले दोन धक्के, त्यानंतर वनिंदू हसरंगाने घेतलेली महत्त्वाची विकेट आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलने केलेली कमाल... याच्या जोरावर RCBने कमबॅक केले. ३५ धावांत ३ विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला मॅन ऑफ दी मॅच ने गौरविण्यात आले. या सामन्यात विराट कोहलीची शिवी पुन्हा चर्चेत आली आणि यावेळी महेंद्रसिंग धोनीची विकेट मिळाल्यानंतर विराटने केलेल्या या कृतीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या RCBकडून विराट कोहली ( ३०), फॅफ ड्यू प्लेसिस ( ३८), महिपाल लोम्रोर ( ४२), रजत पाटीदार ( २१) व दिनेश कार्तिक ( २६) यांनी चांगला खेळ केला. महिपालने RCBचा गडगडलेला डाव सावरला आणि त्यामुळे संघाने ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारली. महिश थिक्सानाने ३, तर मोईन अलीने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड ( २८) व डेवॉन कॉनवे ( ५६) यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, मधल्या फळीत विकेट पडल्या. मोईन अली ( ३ ४) धावांवर बाद झाला आणि सामना पूर्णपणे RCBच्या बाजूने झुकला.
महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर असल्याने थोडी धाकधुक होती, परंतु १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला आणि RCBने सुटकेचा निश्वास टाकला. धोनीची कॅच घेतल्यानंतर रजत पाटीदारने सॅल्यूट केले, तेच विराट कोहलीला एवढा आनंद झाला की त्याच्या तोंडून शिवी निघाली. विराटचे हे सेलिब्रेशन चाहत्यांना आवडले नाही.
Web Title: IPL 2022, CSK vs RCB : Virat Kohli blasted for aggressive celebration after MS Dhoni's dismissal during RCB vs CSK IPL match, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.