Join us  

Ambati Rayudu CSK vs RCB : ३६ वर्षीय अंबाती रायुडूने युवकांना लाजवले; IPL 2022 मधील आतापर्यंतचा सर्वात भारी कॅच, Dinesh Karthikही बघत राहीला, Video 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग चार पराभवांनंतर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:57 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग चार पराभवांनंतर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात CSK ने २३ धावांनी विजय मिळवला आणि गुणखाते उघडले. शिवम दुबे ( नाबाद ९५) आणि रॉबिन उथप्पा ( ८८) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने विजयाचा पाया रचला. त्यानंतर माहीश थिक्साना व रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेत विजय पक्का केला. पण, यांच्याव्यतिरिक्त या विजयात एका खेळाडूची चर्चा रंगली आहे. तो म्हणजे ३६ वर्षीय अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) याची... त्याने हवेत झेपावत एका हाताने टिपलेला चेंडू हा IPL 2022मधील आतापर्यंतचा सर्वात अफलातून झेल ठरतोय...  

RCBच्या डावातील १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा अफलातून झेल घेतला गेला. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBची अवस्था बिकट झाली होती. रवींद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यात आकाश दीप चुकला आणि शॉर्ट कव्हर क्षेत्रावर उभ्या असलेल्या रायुडूने हवेत झेपावत सुरेख झेल टिपला. नॉन स्ट्रायकर दिनेश कार्तिक हा झेल पाहून स्तब्धच राहिला.  

ऋतुराज गायकवाड ( १७) व मोईन अली ( ३) झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था २ बाद ३६ अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी ७४ चेंडूंत १६५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने अखेरच्या १० षटकांत १५०+ धावा कुटल्या.  उथप्पा ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ८८ धावांवर बाद झाला. दुबे ४६ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ९५ धावांवर  नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २१६ धावा केल्या. माहीश थिक्सानाने  RCBला ३३ धावांत ४, रवींद्र जडेजाने ३९ धावांत ३ धक्के दिले. ग्लेन  मॅक्सवेल २६ धावा,  सुयष प्रभुदेसाई १८ चेंडूंत ३५ व शाहबाज अहमद २७ चेंडूंत ४१ धावा केल्या.  दिनेश कार्तिकने  १४ चेंडूंत ३४ धावा केल्या. पण, आरसीबीला ९ बाद १९३ धावांवर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :आयपीएल २०२२अंबाती रायुडूचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App