IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पुढील आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) एनर्जी बूस्टसाठी आणखी काय हवं होतं?; राजस्थान रॉयल्सविरुद्धच्याआयपीएल २०२२मधील अखेरच्या साखळी सामन्यात कॅप्टन धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानला या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर १ मधील स्थान पक्के करायचे आहे, तर चेन्नईचे लक्ष्य स्पर्धेचा शेवट गोड करण्यावर आहे. RRच्या खात्यात १६ गुण आहेत आणि त्यांचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चितच आहे.
ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अली व डेवॉन कॉनव्हे या डावखुऱ्या फलंदाजांनी राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चौथ्या षटकात अलीने १८ धावा कुटल्या. त्यानंतर पुढील षटकात त्याने आर अश्विनला टार्गेट केले आणि १५ धावा चोपल्या. अली व कॉनवे यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
अलीने सहाव्या षटकात बोल्टला टार्गेट केले आणि 6, 4, 4, 4, 4, 4 अशा २६ धावा चोपल्या. अलीने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल २०२२मधीले हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. चेन्नईने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. चेन्नईकडूनही ही दुसरी सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. सुरेश रैनाने २०१४मध्ये पंजाबविरुद्ध १६ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. अलीने आज महेंद्रसिंग धोनीचा २०१२ ( २० चेंडू वि. मुंबई ) विक्रम मोडला. ( पाहा IPL 2022 - CSK vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )