IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती, ती पाहून चेन्नई सुपर किंग्स सहज दोनशे पार जाईल असे वाटत होते. पण, पॉवर प्लेमध्येच CSK ची पॉवर दिसली अन् राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. पहिल्या ६ षटकांतक ७५ धावा देणाऱ्या RR च्या गोलंदाजांनी CSKला धक्के देताना त्यांचा धावांचा वेग संथ केला. मोईन अलीचे शतक ७ धावांनी हुकले. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना चेन्नईला कमी धावातच रोखले. ( पाहा IPL 2022 - CSK vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. अलीने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल २०२२मधीले हे दुसरे जलद चेन्नईने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. आर अश्विनने अली व कॉवने यांची ३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कॉनवे १६ धावांवर LBW झाला.
त्यानंतर ओबेड मॅकॉयने स्लोव्ह बॉल टाकून नारायण जगदीशनला ( १) बाद केले. युजवेंद्र चहलने ११व्या षटकात अंबाती रायुडूला ( ३) बाद करून CSKला चौथा धक्का दिला. चेन्नईने १० धावांत तीन फलंदाज गमावले. चहलची
आयपीएल २०२२मधील ही २५ वी विकेट ठरली आणि त्याने आयपीएलच्या एका पर्वात सर्वधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंमध्ये स्वतःचाच २०१५ सालचा २४ विकेट्सचा विक्रम मोडला. इम्रान ताहीरने २०१९मध्ये २६ विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. ६ षटकांत १ बाद ७५ धावा करणाऱ्या चेन्नईला त्यांनी पुढील ७ षटकांत ३३ धावांत ३ धक्के दिले. चेन्नईच्या १४ षटकांत ४ बाद १११ धावा झाल्या होत्या.
धोनी व अलीने ५२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. चहलने १९व्या षटकात चतुराईने धोनीला ( २६) बाद केले. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅकॉयने CSKचा सेट फलंदाज अलीला बाद केले. अलीने ५७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९३ धावा केल्या. चेन्नईला ६ बाद १५० धावाच करता आल्या. चहल व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2022 CSK vs RR Live Updates : Moeen Ali missed out from his maiden IPL century - 93 (57); Rajasthan Royals need 151 to face Gujarat Titans on 24th May in Qualifier 1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.