IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये ( IPL 2023) खेळणार की नाही, याचे उत्तर कॅप्टन कूलने त्याच्या स्टाईलमध्ये दिले. ४१ वर्षीय धोनी हा पुढील वर्षीही चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) खेळणार आहे आणि त्याच्या खांद्यावरच कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. IPL 2022 मधील अखेरच्या साखळी सामन्यात CSK आज राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. Ms Dhoni ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी धोनीला पुन्हा एकदा विचारण्यात आले, की पुढील आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीत दिसणार का?; यावर त्याने मजेशीर उत्तर दिले.
मागील चार वर्षांत धोनीला हाच प्रश्न अनेकदा विचारला गेला...
२०१९ -
महेंद्रसिंग धोनी - होय, आशा करतो पुढील वर्षी खेळणार
२०२०-
महेंद्रसिंग धोनी- Definitely, Not.
२०२१ -
महेंद्रसिंग धोनी - Still I haven't left behind.
२०२२ -
महेंद्रसिंग धोनी - Definitely, it will be unfair not to say thanks to Chepauk crowd.
तो म्हणाला, चेपॉकवर चाहत्यांचा निरोप न घेता, आयपीएलमधून निवृत्ती घेणे चुकीचे ठरेल. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी नक्कीच मला पुन्हा खेळायला आवडेल. आशा करतो की पुढील वर्षी वेगवेगळ्या शहरात खेळायला मिळेल आणि तेथील प्रेक्षकांना मला धन्यवाद बोलता येईल. चेन्नईच्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिले आहे आणि त्यांच्यासमोर खेळायला आवडेल. पण, ती माझी अखेरची आयपीएल असेल का हा मोठा प्रश्न आहे. ते पुढील वर्षी ठरेल.
राजस्थान रॉयल्सला आज अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून आयपीएल २०२२मधील क्वालिफायर १ मधील स्थान पक्के करायचे आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचे लक्ष्य स्पर्धेचा शेवट गोड करण्यावर आहे. RRच्या खात्यात १६ गुण आहेत आणि त्यांचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चितच आहे. CSKचे स्पर्धेतील आव्हान केव्हाच संपुष्टात आले असल्याने त्यांना आज हरले तरी काही फरक पडणार नाही.
Web Title: IPL 2022 CSK vs RR Live Updates : MS Dhoni will come back next year to play for CSK. “It will be unfair to not to say thank you to Chennai,” says MSD Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.