Join us  

R Ashwin IPL 2022, CSK vs RR Live Updates : आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर प्रथमच पराक्रम केला

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:13 PM

Open in App

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना चेन्नईला कमी धावातच रोखले. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या, परंतु त्यानंतर त्यांना पुढील १४ षटकांत ५ बाद ७५ धावा करता आल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) च्या अर्धशतकाच्या आणि आर अश्विनच्या ( R Ashwin) दमदार खेळीच्या जोरावर RR ने विजय पक्का केला. 

ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले.  प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. आर अश्विनने अली व कॉवने यांची ३९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कॉनवे १६ धावांवर LBW झाला. नारायण जगदीशन ( १), अंबाती रायुडू ( ३) हे लगेच माघारी परतले. 

दोन जीवदान मिळालेल्या महेंद्रसिंग धोनी ( २६) व अलीने ५२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. अली ५७ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला. चेन्नईला ६ बाद १५० धावाच करता आल्या. चहल व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, जोस बटलर ( २) पुन्हा अपयशी ठरला, परंतु यशस्वी जैस्वालने फटकेबाजी सुरू ठेवली आहे. राजस्थानने ४ षटकांत १ बाद ४१ धावा केल्या आहेत. यशस्वी व संजू सॅमसन यांनी ४१ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. ९व्या षटकात मिचेल सँटनरने ही जोडी तोडली. संजूला ( १५) त्याने रिटर्न कॅच घेत बाद केले. मोईन अलीने १२व्या षटकात देवदत्त पडिक्कलचा ( ३) त्रिफळा उडवला.

यशस्वी एका बाजूने खिंड लढवत होता आणि त्याने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर यशस्वीने आक्रमक खेळ सुरू केला आणि प्रशांत सोळंकीच्या गोलंदाजीवर फटके मारले. पण, अखेरच्या चेंडूवर असाच एक फटका मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी झेलबाद झाला. त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५९ धावा केल्या. सोळंकीने पुढील षटकात शिमरोन हिटमायरची ( ६) विकेट घेत RR ला मोठा धक्का दिला. पण, आर अश्विन खेळपट्टीवर अडून बसला आणि त्याने दमदार फटकेबाजी केली. १७व्या षटकात ११, १८व्या षटकात १३ आणि १९व्या षटकात १२ धावा चोपून त्याने सामना ६ चेंडू ७ धावा असा जवळ आणला. २०व्या षटकात पहिल्या चेंडूवर रियान परागने एक धाव काढून दिली आणि त्यानंतर अश्विनने चौकार व १ धाव घेत सामना बरोबरीत आणला. अश्विन २३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने १९.४ षटकांत ५ बाद १५१ धावा केल्या. 

२००८ नंतर राजस्थान रॉयल्स प्रथमच क्वालिफायर १ खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर गुजरात टायटन्सचे आव्हान आहे. २४ मे रोजी कोलकाता येथे ही लढत होणार आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२आर अश्विनराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App