IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी पाहून चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला. रवींद्र जडेजाला कर्णधारपदाचा भार न पेलवल्याने ८ सामन्यानंतर त्याने पुन्हा धोनीकडे ही जबाबदारी दिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी जेव्हा नाणेफेकीला आला तेव्हा एकच नारा घुमला... धोनी, धोनी..., धोनी, धोनी...! असा आवाज पुण्याच्या स्टेडियमवर दुमदुमत होता. धोनीचे कर्णधारपदावर परतण्यासोबत ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याचा फॉर्मही परतला आणि त्याने थेट सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली.
SRHचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केनचं बोलून झाल्यानंतर धोनी आला अन् जयघोष झाला. ड्वेन ब्राव्हो आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाही, तर शिवम दुबेलाही बसवण्यात आले आहे. त्यांच्याजागी डेवॉन कॉनवे व सिमरजीत सिंग खेळणार आहेत. तो म्हणाला, पुढील वर्षीही तुम्ही माला पिवळ्या जर्सीत दिसाल, परंतु ती हिच पिवळी जर्सी असेल किंव दुसरी कुठली, ही वेगळी गोष्ट असेल.'' त्यामुळे धोनी चेन्नईचाच भाग असेल, परंतु तो खेळाडू म्हणून नसेल तर मेंटॉर म्हणून असण्याची शक्यता बळावली आहे.
ऋतुराज व डेवॉन कॉनवे यांनी CSK च्या डावाची सुरुवात केली. कॉनवे नुकताच विवाह बंधनात अडकला अन् सुट्टी संपवून पुन्हा भारतात दाखल झाला. ऋतुराज व कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली. ज्या उम्रान मलिकच्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण केले होते. त्याला आज ऋतुराजने सहज झोडले. मलिकने टाकलेल्या वेगवान चेंडूला योग्य दिशा देण्याचं काम फक्त ऋतुराजने केले. त्यामुळे त्याचे फकटे सहज सुंदर दिसत होते. ऋतुराजने ३८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी करताना कॉनवेसह ( २९) पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
ऋतुराजने आज आयपीएलमध्ये १००० + धावांचा पल्लाही ओलांडला. त्याने यासाठी केवळ ३१ इनिंग्ज खेळल्या. आयपीएल इतिहासात सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी ऋतुराजने बरोबरी केली. सुरेश रैना ( ३४), देवदत्त पडिक्कल ( ३५) व रिषभ पंत ( ३५) हे या विक्रमात मागे आहेत.
Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : 33 ball fifty for Ruturaj Gaikwad and Sachin completed 1000 runs in IPL from 31 innings - fastest by an Indian in IPL history.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.