IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) ने आज घरचे मैदान गाजवले. पुणेकर ऋतुराजने ९९ धावांची अविश्वसनीय खेळी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचे शतक १ धावेने हुकल्याची खंत साऱ्यांनाच वाटली. विराट कोहली, इशान किशन, पृथ्वी शॉ व ख्रिस गेल यांच्यानंतर आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा तो पाचवा फलंदाज ठरला. ऋतुराजने ५७ चेंडूंत ९९ धावा केल्या. त्यात चौकार व षटकारांनी अशा १२ चेंडूंत ६० धावा चोपल्या.
ऋतुराज व डेवॉन कॉनवे ( Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे. विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला. ९९ धावांवर असणाऱ्या ऋतुराजने टी नटराजनच्या चेंडूवर कट मारला अन् बॅकवर्ड पॉईंटवर असलेल्या भुवनेश्वर कुमारने तो झेलला. शतक हुकल्याने माघारी जाणाऱ्या ऋतुराजच्या खेळीचं प्रतिस्पर्धी SRH नेही कौतुक केले. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा २००+ धावा करण्याचा विक्रम CSKने नावावर करताना RCB ला ( २१) मागे टाकले.
प्रत्युत्तरात हैदराबादकडून कर्णधार केन विलियम्सन व अभिषेक शर्मा यांनी दमदार सुरुवात केली. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर अभिषेकचा सोपा झेल मुकेश चौधरीने सोडला. पण, ६व्या षटकात मुकेशनेच ही विकेट मिळवून दिली. केनसोबतची ५८ धावांची भागीदारी मोडताना अभिषेकला ३९ धावांवर त्याने बाद केले. त्याच षटकात राहुल त्रिपाठीलाही ( ०) माघारी पाठवले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर केनचा सोपा झेल महेंद्रसिंग धोनीने सोडला. तेव्हा केन १८ धावांवर खेळत होता. हैदराबादच्या ८ षटकांत २ बाद ७२ धावा झाल्या होत्या.
पाहा ऋतुराज व कॉनवे यांची फटकेबाजी
Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : heartbreak for Ruturaj Gaikwad, missed out from a century, Goes for 99 in 57 balls with 6 four and 6 sixes, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.