Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: मोईन अली, रविंद्र जाडेजाची दमदार फटकेबाजी; हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य

हैदराबादच्या नटराजन, सुंदरने घेतले प्रत्येकी दोन बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:27 PM2022-04-09T17:27:09+5:302022-04-09T17:27:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 CSK vs SRH Live Updates Moeen Ali Ravindra Jadeja batting take Chennai par 150 against Hyderabad | Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: मोईन अली, रविंद्र जाडेजाची दमदार फटकेबाजी; हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य

Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: मोईन अली, रविंद्र जाडेजाची दमदार फटकेबाजी; हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: अष्टपैलू मोईन अली आणि कर्णधार रविंद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत १५४ धावा केल्या आणि सनरायजर्स हैदराबादला १५५ धावांचे आव्हान दिले. हैदराबादच्या नटराजन (Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी २-२ बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. रॉबिन उथप्पा १५ तर ऋतुराज गायकवाड १६ धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर मोईन अली आणि अंबानी रायडूने अर्धशतकी भागीदारी केली. रायडू २७ धावांवर बाद झाला. पण मोईन अलीने दमदार फटकेबाजी केली. मोईन अलीचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं. तो ३५ चेंडूत ४८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार रविंद्र जाडेजाने फटकेबाजीचा प्रयत्न करत २३ धावांची भर घातली. त्यामुळे चेन्नईला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली.

सनरायझर्स हैदराबाद संघ- 1 अभिषेक शर्मा, 2 केन विल्यमसन (कर्णधार), 3 राहुल त्रिपाठी, 4 एडन मार्करम, 5 निकोलस पूरन (विकेटकीपर), 6 शशांक सिंग, 7 वॉशिंग्टन सुंदर, 8 भुवनेश्वर कुमार, 9 मार्को यान्सिन, 10 उमरान मलिक, 11 टी नटराजन

चेन्नई सुपर किंग्ज- 1 ऋतुराज गायकवाड, 2 रॉबिन उथप्पा, 3 मोईन अली, 4 अंबाती रायुडू, 5 रवींद्र जाडेजा (कर्णधार), 6 शिवम दुबे, 7 महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), 8 ड्वेन ब्राव्हो, 9 महेश तिक्षणा, 10 ख्रिस जॉर्डन, 11 मुकेश चौधरी

Web Title: IPL 2022 CSK vs SRH Live Updates Moeen Ali Ravindra Jadeja batting take Chennai par 150 against Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.