IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : ८ सामन्यांत २ विजय मिळवल्यानंतर रवींद्र जडेजाने पुन्हा चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवली. धोनीला पुन्हा नेतृत्व करताना पाहून चाहते सुखावले आणि धोनी नावाचा गजर झाला... त्यात ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे ( Ruturaj Gaikwad & Devon Conway ) या जोडीने १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. धोनी कर्णधार होताच ऋतुराज व कॉनवेचा फॉर्म परतला अशी चर्चा सुरू झाली. पण, ऋतुराजने ती खोडून काढली अन् त्याच्या विधानाने भुवया उंचावल्या.
ऋतुराज व डेवॉन कॉनवे यांनी CSK च्या डावाची दणक्यात सुरुवात केली. कॉनवे नुकताच विवाह बंधनात अडकला अन् सुट्टी संपवून पुन्हा भारतात दाखल झाला. ज्या उम्रान मलिकच्या वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण केले होते. त्याला आज ऋतुराजने सहज झोडले. मलिकने टाकलेल्या वेगवान चेंडूला योग्य दिशा देण्याचं काम फक्त ऋतुराजने केले. त्यामुळे त्याचे फकटे सहज, सुंदर दिसत होते. ऋतुराजने आज आयपीएल इतिहासात सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. या जोडीने १६४+ धावा करताच एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली यांचा विक्रम मोडला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आता ऋतुराज व कॉनवे या जोडीच्या नावावर नोंदवला गेला आहे. विराट व एबी यांचा १५७ धावांचा विक्रम आज मोडला गेला.
हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत केवळ २२ धावाच दिल्या. ९९ धावांवर असणाऱ्या ऋतुराजच्या शतकी धावेची सारेच वाट पाहत होते, पण घडले नको ते. टी नटराजनच्या चेंडूवर ऋतुराजने कट मारला अन् बॅकवर्ड पॉईंटवर असलेल्या भुवनेश्वर कुमारने तो झेलला.ऋतुराज ५७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारासह ९९ धावांवर बाद झाला.त्यानंतर
महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. कॉनवेने ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा करताना चेन्नईला २ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले. आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ वेळा २००+ धावा करण्याचा विक्रम CSKने नावावर करताना RCB ला ( २१) मागे टाकले.
ऋतुराज काय म्हणाला?'आम्ही रणनीती ठरवूनच मैदानावर आलो होतो. खेळपट्टी संथ असल्याने सुरुवातीला सावध खेळण्याचे मी ठरवले होते. डेवॉन कॉनवेसोबत मी प्रथमच खेळलो, परंतु नेटमध्ये आम्ही बराच एकत्र सराव केलाय. त्यामुळे आमच्यातील संवाद चांगलाच झाला. मी नैसर्गिक खेळ करण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाल्याचा या खेळीशी काही संबंध नाही. लक्ष्य केंद्रीत ठेऊन खेळ करण्याचा माझा प्रयत्न होता आणि मी निकालाची पर्वा केली नाही. या लक्ष्याचा बचाव करून असा मला विश्वास आहे,'असे ऋतुराज म्हणाला.
Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : Nothing different with MS as captain. The thought process was to be focused on the process, and not worry about results, Said Ruturaj Gaikwad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.