IPL 2022, Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी पाहून चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला. रवींद्र जडेजाला कर्णधारपदाचा भार न पेलवल्याने ८ सामन्यानंतर त्याने पुन्हा धोनीकडे ही जबाबदारी दिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी जेव्हा नाणेफेकीला आला तेव्हा एकच नारा घुमला... धोनी, धोनी..., धोनी, धोनी...! असा आवाज पुण्याच्या स्टेडियमवर दुमदुमत होता. पण, अशात नाणेफेक झाल्यानंतर धोनीच्या विधानानं शांतता पसरली...
आयपीएल २०२२ला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने CSKच्या नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. जडेजाने त्याच्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ८ सामन्यांत जडेजाला २२.४०च्या सरासरीने ११२ धावा करता आल्या आहेत आणि २१३ धावा देत त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
नाणेफेकीला आलेला धोनी काय म्हणाला?
SRHचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केनचं बोलून झाल्यानंतर धोनी आला अन् जयघोष झाला. ड्वेन ब्राव्हो आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाही, तर शिवम दुबेलाही बसवण्यात आले आहे. त्यांच्याजागी डेवॉन कॉनवे व सिमरजीत सिंग खेळणार आहेत. तो म्हणाला, पुढील वर्षीही तुम्ही माला पिवळ्या जर्सीत दिसाल, परंतु ती हिच पिवळी जर्सी असेल किंव दुसरी कुठली, ही वेगळी गोष्ट असेल.'' त्यामुळे धोनी चेन्नईचाच भाग असेल, परंतु तो खेळाडू म्हणून नसेल तर मेंटॉर म्हणून असण्याची शक्यता बळावली आहे.
Web Title: IPL 2022, CSK vs SRH Live Updates : You will definitely see me in the yellow jersey [next year], whether this yellow jersey or some other yellow jersey, that's a different thing, says MS Dhoni, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.