दोन महिन्यांपूर्वी डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात SRHला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांना केवळ तीनच सामने जिंकता आले आणि ते गुणतक्त्यात तळाला राहिले. आयपीएलच्या या पर्वात डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळल्यानंतर त्यांचे चाहते प्रचंड निराश झाले होते. SRHनं एकमेव जेतेपद जिंकले ते वॉर्नरच्या नेतृत्वाखालीच, तरीही त्याला वगळले गेले. त्याआधी त्याला कर्णधारपदावरून हटवले गेले.
त्याच वॉर्नरनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २८९ धावा करून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. वॉर्नरनं The Economic Timesला दिलेल्या मुलाखतीत त्याचं दुःख व्यक्त केलं. तो म्हणाला,''ज्या संघावर अनेक वर्ष मी प्रेम केलं, त्यांनीच कोणतीच चूक नसताना जेव्हा संघातून वगळळे आणि कोणतंही कारण न देता कर्णधारपद काढून घेतले, यानं खूप दुःख झालं. पण, मला त्याबाबत काही तक्रार करायची नाही. भारतीय चाहते माझ्यासोबत नेहमीच होते आणि त्यांच्यासाठीच मी खेळलो. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आम्ही खेळतो.''
SRHचे सहाय्यक प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीन यांनी वॉर्नरला संघाबाहेर करण्यामागचं कारण सांगितलं. फलंदाज चांगली कामगिरी करत नसेल, तर असे निर्णय घ्यावे लागतात. ''आयपीएल संघात स्थान न मिळण्यामागचं कारण मला नाही माहीत. पण, मी एक नक्की सांगतो की मी शक्य तेवढा कसून सराव केला. एकही दिवस मी चूकवला नाही. नेट्समध्येही मी चांगली फलंदाजी केली. त्यानंतरही संघातून वगळले, तेव्हा वेदना झाल्या. पण मला माहित होतं की मला आणखी एक संधी मिळेल,''असे वॉर्नर म्हणाला.
यापूर्वी झालेल्या एका मुलाखतीत वॉर्नरनं कर्णधारपदावरून का काढलं, यामागे कारण सांगितले नसल्याचे म्हटले होते. वॉर्नरनं २०१६मध्ये हैदराबादला आयपीएल जेतेपद पटकावून दिले होते आणि तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ९७३ धावा) याच्यानंतर वॉर्नरचा ( ८४८ धावा) क्रमांक येतो.
संबंधित बातम्या
IPL 2021मध्ये सहकाऱ्यांना पाणी देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनं देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला अन्...
Web Title: IPL 2022, David Warner : When you're dropped from the team you love and stripped of captaincy, it hurts, David Warner on SRH snub
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.