IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : आयपीएलच्या २०२० व २०२१ या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याने एकच विकेट घेतली होती. त्यानंतर KKRने त्याला रिलीज केले आणि आयपीएल २०२२त तोच कुलदीप यादव KKRविरुद्ध राग काढताना दिसतोय... ८व्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर रिषभने १४व्या षटकात कुलदीपला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने पुन्हा दोन विकेट्स घेतल्या. यावेळी रिषभ पंतने यष्टिंमागे mind-blowing कॅच घेत श्रेयस अय्यरला माघारी पाठवले, तर आंद्रे रसेलची चतुराईने स्टम्पिंगही केली.
दिल्लीकडून आज पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने ( Chetan Sakariya) पहिल्याच षटकात कोलकाताला मोठा धक्का दिला. आरोन फिंचचा ( ३) त्रिफळा उडवून दिल्लीच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. त्यानंतर पाचव्या षटकात अक्षर पटेलने KKRला आणखी एक धक्का देताना वेंकटेश अय्यरला ( ६) बाद केले. ८व्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने KKRला दोन धक्के दिले. पदार्पणवीर बाबा इंद्रजित ( ६) आणि सुनील नरीन ( Golden Duck) यांना त्याने बाद केले. KKRविरुद्धच्या मागील सामन्यात कुलदीपने ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
कर्णधार श्रेयर अय्यर व नितिश राणा यांनी ४८ धावांची भागीदारी करताना KKRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही डोईजड होणारी जोडी तोडण्यासाठी रिषभने पुन्हा कुलदीपच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याने पुन्हा कमाल केली. १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने अय्यरला बाद केले. कुलदीपने टाकलेला चेंडू जरा खालीच राहिला आणि अय्यरच्या बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाकडे गेला. रिषभनेही चपळाई दाखवताना खाली राहिलेला चेंडू सुरेख टिपला. अय्यर ३७ चेंडूंत ४२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेलची ( ०) स्टम्पिंग झाली. रिषभच्या हातून चेंडू निसटला होता, परंतु तो यष्टिंवर आदळला. दिल्लीचे सहा फलंदाज ८३ धावांवर माघारी परतले आणि त्यापैकी चार विकेट्स या कुलदीपने घेतल्या.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IPL 2022, DC vs KKR Live Updates : Two wickets in an over for Kuldeep Yadav for the second time in the game, mind-blowing catch by Rishabh Pant, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.