Join us  

Mitchell Marsh IPL 2022, DC vs LSG Live Updates : गोलंदाजांना बेक्कार कुटणाऱ्या मिचेल मार्शची विकेट ढापली, लखनौने चिटींग केली?; Video 

२ बाद १३ अशा अवस्थेत दिल्लीचा संघ असताना रिषभ पंत व मिचेल मार्श ( Mitchell Marsh) यांनी पुढील २५ चेंडूंत ६० धावा कुटल्या. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 6:36 PM

Open in App

IPL 2022, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्ने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काही खास झाली नाही. पृथ्वी शॉ नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळण्याच्या प्रयत्नात ५ धावांवर माघारी परतला. फॉर्मात असलेला डेव्हिड वॉर्नर ( David Warner)  धावांवर बाद झाला. २ बाद १३ अशा अवस्थेत दिल्लीचा संघ असताना रिषभ पंत व मिचेल मार्श ( Mitchell Marsh) यांनी पुढील २५ चेंडूंत ६० धावा कुटल्या. मिचेल व रिषभ यांची फटकेबाजी पाहून सामना १५ षटकांतच संपेल असेच दिसत होते. पण, दुर्दैवाने मिचेल बाद नसूनही पेव्हेलियनमध्ये परतला.  

दुश्मंथा चमिराने दुसऱ्याच षटकात दिल्लीला धक्का दिला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पृथ्वीने पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस चमिराने चेंडूंत थोडासा बदल  केला अन् पृथ्वी ( ५) झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरही ३ धावांवर बाद झाला. मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी तुफान फटकेबाजी केली.  या दोघांनी १८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकार खेचून ५३ धावा जोडल्या. मार्श व पंत ही जोडी तोडण्यासाठी LSGने रवी बिश्नोई व के गौथम या फिरकीपटूंना पाचारण केले. अतिआत्मविश्वास झालेल्या मार्शला मग गौथमने बाद केले. तो २० चेंडूंत तो ३ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर माघारी परतला. पण, तो बाद नव्हता...

गौथमने टाकलेला चेंडू त्याच्या बॅट शेजारून यष्टीरक्षक क्विंटनच्या हाती विसावला आणि जोरदार अपील झाले. अम्पायरने बाद असल्याचा निर्णय दिला. गौथमही या विकेटबाबत निश्चित नव्हता. रिप्ले जेव्हा पाहिला गेला तेव्हा बॅट व चेंडूचा संपर्कच झाला नसल्याचे दिसले आणि DCच्या डग आऊटमध्ये निराशा पसरली. 

 

क्विंटन डी कॉक व लोकेश यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर लोकेश व दीपक हुडा ( Deepak Hooda) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह LSGला मोठी धावसंख्या उभारून दिली. क्विंटन डी कॉक ( २३)  व राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लोकेश आणि दीपक हुडा यांनी ६१ चेंडूंत ९५ धावा जोडल्या. दीपक ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर बाद झाला. स्वतःच्याच गोलंदाजीवर शार्दूलने मस्त रिटर्न कॅच घेतला. लोकेश ५१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर माघारी परतला. लखनौला ३ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. मार्कस  स्टॉयनिसचा ( १७*) खेळ संथ झाला. तीनही विकेट शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App