IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही?

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : सर्व काळजी घेऊनही  आयपीएल २०२२साठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:34 PM2022-04-20T16:34:16+5:302022-04-20T16:41:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 DC vs PBKD match today in Mumbai, Another DC foreign player Covid positive; another round of testing before tonight’s game | IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही?

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : सर्व काळजी घेऊनही  आयपीएल २०२२साठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच... दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याच्यासह पाच सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि BCCIसाठी धोक्याची घंटी वाजली. DCची ही पाच जण वगळता अन्य सदस्यांचा रिपोर्ट कालपर्यंत निगेटिव्ह होता. पण, खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने DC vs पंजाब किंग्स हा सामना पुण्यातून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेतला. पण, आजचा हा सामना होईल की नाही, यावरच साशंकता आहे. Inside.sports ने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील परदेशी खेळाडू टीम सेईफर्ट याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ( Tim Seifert Tested positive for COVID-19 ) 

दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व सदस्यांची सकाळी RT-PCR चाचणी करण्यात आली आणि त्यात परदेशी खेळाडूसह काहींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआय मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि ते आणखी रिपोर्ट समोर यायची वाट पाहत आहेत. ''ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना नियमानुसार सराव सत्रात सहभागी होता येईल. अजूनही काही  रिपोर्ट यायचे बाकी आहेत. एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट झालं की निर्णय घेतला जाईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने Insidesports.in ला सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की,''१६ एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या प्रत्येक सदस्याची RT-PCR चाचणी केली जात आहे. १९ एप्रिलपर्यंत चौथ्या फेरीअखेरीस आलेल्या रिपोर्टमध्ये सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. २० तारखेचा सकाळी त्यांची आणखी एक RT-PCR चाचणी घेतली गेली.''   

याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोणाला झाला कोरोना?

  • पॅट्रीक फॅरहॅट- फिजिओथेरपिस्ट ( १५ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
  • चेतन कुमार - स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट ( १६ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
  • मिचेल मार्श - खेळाडू ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
  • अभिजित साळवी -  टीम डॉक्टर ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
  • आकाश माने - सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)

 
आजचा सामना न झाल्यास काय?

  • बीसीसीआयच्या नियमानुसार एकादा संघ १२ सदस्य मैदानावर उतरवण्यास असमर्थ राहिल्यास तो सामना स्थगित केला जाईल. तो पुढे केव्हा व कधी खेळवायचा याचा निर्णय समिती घेईल. तो खेळवायचा की नाही हेही समिती ठरवेल.  

Web Title: IPL 2022 DC vs PBKD match today in Mumbai, Another DC foreign player Covid positive; another round of testing before tonight’s game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.