David Warner IPL 2022, DC vs PBKS Live Updates : विजयानंतर डेव्हिड वॉर्नरचं 'Pushpa' स्टाईल सेलिब्रेशन; Rohit Sharmaच्या मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, Video

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही मनोबल खचू न देता दिल्ली कॅपिटल्सने शानदार कामगिरी करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:47 PM2022-04-20T22:47:14+5:302022-04-20T22:47:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, DC vs PBKS Live Updates : David Warner Pushpa celebration; he became the 2nd batter after Rohit Sharma to score more than 1,000 runs against an IPL opponent, Video | David Warner IPL 2022, DC vs PBKS Live Updates : विजयानंतर डेव्हिड वॉर्नरचं 'Pushpa' स्टाईल सेलिब्रेशन; Rohit Sharmaच्या मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, Video

David Warner IPL 2022, DC vs PBKS Live Updates : विजयानंतर डेव्हिड वॉर्नरचं 'Pushpa' स्टाईल सेलिब्रेशन; Rohit Sharmaच्या मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही मनोबल खचू न देता दिल्ली कॅपिटल्सने शानदार कामगिरी करून दाखवली. खलिल अहमद ( २-२१), ललित यादव ( २-११), अक्षर पटेल ( २-१०) व कुलदीप यादव ( २-२४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन पंजाब किंग्सला IPL 2022मधील निचांक धावसंख्येवर रोखले. त्यानंतर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) व डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी पंजाबच्या गोलंदाजांना झोडपले. नाबाद राहिलेल्या वॉर्नरने विजयाचे सेलिब्रेशन Pushpa स्टाईलने केले. त्याने आज Rohit Sharmaच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्सची सुरूवातच निराशाजनक झाली. शिखर धवन ( ९)  व मयांक अग्रवाल ( २४) हे झटपट माघारी परतले.  लाएम लिव्हिंगस्टोन ( २) व जॉनी बेअरस्टो (  ९) हेही अपयशी ठरल्यानंतर जितेश शर्मा ( ३२) व शाहरूख खान ( १२) यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंजाबचा संपूर्ण संघ ११५ धावांवर तंबूत परतला. प्रत्युत्तरात, पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरूवात करून सामना लवकर संपवण्याचा निर्धार दाखवला. या दोघांनी २१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.दिल्लीने ६ षटकांत ८१ धावा चोपून IPL 2022 मधील पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. राहुल चहरने ही भागीदारी संपुष्टात आणली. पृथ्वी २० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर बाद झाला.


डेव्हिड वॉर्नरने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना दिल्लीचा विजय पक्का केला. वॉर्नरने ३० चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून नाबाद ६० धावा करताना दिल्लीला १०.३ षटकांत ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सर्फराज खान १२ धावांवर नाबाद राहिला. एकाच संघाविरुद्ध १०००+ धावा करणारा वॉर्नर हा रोहित शर्मानंतर दुसरा फलंदाज ठरला. रोहितने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा पराक्रम केला आहे आणि असा विक्रम नोंदवणारे हे जगातील दोनच फलंदाज आहेत.  

दिल्लीचा हा सर्वात जास्त ( ५७ चेंडू) चेंडू राखून मिळवलेला मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी २००८मध्ये ४२ चेंडू राखून डेक्कन चार्जर्सला पराभूत केले होते.  

Web Title: IPL 2022, DC vs PBKS Live Updates : David Warner Pushpa celebration; he became the 2nd batter after Rohit Sharma to score more than 1,000 runs against an IPL opponent, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.