IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील दोन खेळाडूंसह एकूण ६ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीवर प्रश्नचिन्ह होतं. आज सकाळी झालेल्या RT-PCR चाचणीत टीम सेईफर्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व सदस्यांना आपापल्या रूममध्येच राहण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान पंजाब किंग्सचा संघ मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पोहचून सरावालाही लागला होता. सामना सुरू व्हायला तास शिल्लक असताना दिल्लीच्या खेळाडूंनी ब्रेबॉर्न स्टेडियम गाठले, पण फक्त १५ खेळाडू व निवडक सपोर्ट स्टाफ सदस्यांसह दिल्लीचा संघ ब्रेबॉर्नवर दाखल झाला आहे.
दरम्यान पुण्यातील आणखी एक सामना मुंबईत हलवला गेला. दिल्ली विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी होणारी लढत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोणाला झाला कोरोना?
पॅट्रीक फॅरहॅट- फिजिओथेरपिस्ट ( १५ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)चेतन कुमार - स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट ( १६ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)मिचेल मार्श - खेळाडू ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)अभिजित साळवी - टीम डॉक्टर ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)आकाश माने - सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)टीम सेईफर्ट - खेळाडू ( २० एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)