Delhi Capital versus Punjab Kings : दोन वर्षांनंतर संपूर्ण इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2022) चे पर्व भारतात होत असल्याने क्रिकेटचाहते आनंदित होते आणि आतापर्यंत झालेल्या ३० सामन्यांचा त्यांना आस्वाद लुटला. सारेकाही सुरळीत सुरू असताना कोरोना व्हायरसने Bio-Bubble मध्ये शिरकाव केला. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली, त्यामुळे DC विरुद्ध पंजाब किंग्स या लढतीवर अनिश्चिततेचं सावट होतं. त्यात आता BCCIने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( DC vs PBKS) यांच्यातील लढत बुधवारी पुण्यातील MCA स्टेडियमवर होणार होती, परंतु आता BCCIने घेतलेल्या निर्णयानुसार ही लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. दिल्लीच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मुंबई-पुणे प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोणाला झाला कोरोना?
- पॅट्रीक फॅरहॅट- फिजिओथेरपिस्ट ( १५ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- चेतन कुमार - स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट ( १६ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- मिचेल मार्श - खेळाडू ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- अभिजित साळवी - टीम डॉक्टर ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- आकाश माने - सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
हे सर्व सदस्य विलगिकरणात असून वैद्यकीय टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. आता सहाव्या व सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना पुन्हा DCच्या बायो बबलमध्ये प्रवेश मिळेल. ही पाच जणं सोडून १६ एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व सदस्यांची दररोज RT-PCR टेस्ट घेतली जात आहे आणि आज घेतलेल्या चौथ्या फेरीत सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. २० एप्रिलला या सर्वांनी पुन्हा RT-PCR टेस्ट होणार आहे.