Join us  

Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय, अखेरच्या षटकात रंगले नाटक!

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने ( RR) वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) दणदणीत विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:36 PM

Open in App

जोस बटलरचे ( Jos Buttler ) शतक अन् संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कलच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने IPL 2022 मधील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. त्यानंतर आर अश्विन व प्रसिद्ध कृष्णा यांनी दिल्लीला धक्के दिले. पृथ्वी शॉ व रिषभ पंत यांनी संघर्ष केला, परंतु तो तुटपुंजा ठरला. शतकवीर जोस बटलर आजच्या सामन्याचा स्टार ठरला. प्रसिद्धने १९वे षटक निर्धाव फेकून दिल्लीच्या संघर्षाची हवाच काढली. 

वानखेडे स्टेडिमवर जोस बटलरचे वादळ घोंगावले. १४ चेंडूंत ११ धावांवर असणाऱ्या बटलरने गिअर बदलला आणि ६५ चेंडूंत ११६ धावांची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत ९ चौकार व ९ षटकारांचा असा १८ चेंडूंत ९० धावांचा पाऊस पडला. सावध सुरुवातीनंतर बटलर व देवदत्त पडिक्कल यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. बटलर व पडिक्कल यांनी ९१ चेंडूंत १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली.  पडिक्कलने ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा कुटल्या. त्यानंतर बटलरने शतक झळकावले. शिखर धवननंतर सलग शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला. बटलरने ६५ चेंडूंत ९ चौकार व ९ षटकारांनी ११६ धावांची खेळी केली.   कर्णधार सॅमसननेही १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४६ धावा चोपल्या. राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला.  दिल्ली कॅपिटल्सनेही धडाक्यात सुरूवात केली. पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टला सलग दोन चौकार खेचले. डेव्हिड वॉर्नरचेही नाणे आज खणखणीत वाजेल असेच वाटले होते. पण, प्रसिद्ध कृष्णाने चतुराईने ४३ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना वॉर्नरला ( २८) बाद केले. त्यानंतर आलेल्या सर्फराज खानला पहिल्याच चेंडूवर आर अश्विनने बाद केले. पृथ्वी व कर्णधार रिषभ पंत खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले. पृथ्वी चांगली फटकेबाजी करून दिल्लीचा धावांची सरासरी १०+ या वेगाने कायम राखली. २२ धावांवर असताना रिषभचा झेल सीमारेषेवर शिमरोन हेटयमारने सोडला. पण, १०व्या षटकात आर अश्विनने DC ला मोठा धक्का दिला. पृथ्वी ३७ धावांवर ट्रेंट बोल्टच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर आता रिषभवरच सर्व जबाबदारी होती. त्याने रियान परागने टाकलेल्या ११व्या षटकात २२ धावा चोपल्या. ४३ धावांवर रिषभला आणखी एक जीवदान मिळाले आणि यावेळेस युजवेंद्र चहलने सोपा झेल टाकला. पण, रिषभचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रसिद्ध कृष्णाने त्याच षटकात रिषभला चकवले आणि त्याच्या बॅटला आदळून चेंडू जागच्याजागी हवेत उंच उडाला. देवदत्त पडिक्कलने अफलातून कॅच घेतली. रिषभ २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात चहलने DCच्या अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला. इथून दिल्लीला कमबॅक करणे अशक्य होते. 

रोव्हमन पॉवेल व ललित यादव यांनी दिल्लीच्या आशा कायम राखताना जोरदार फटकेबाजी केली. बोल्टच्या १८व्या षटकात १५ धावा आल्यानंतर दिल्लीला १२ चेंडूंत ३६ धावा करायच्या होत्या. कृष्णाने १९व्या षटकातील पहिली दोन चेंडू निर्धाव टाकली अन् तिसऱ्या चेंडूवर ललित यादवची ( ३७) विकेट काढली. प्रसिद्धने १९वे षटक निर्धाव फेकल्यामुळे दिल्लीला अखेरच्या षटकात ३६ धावा करायच्या होत्या. ओबेय मकॉयचा २०व्या षटकातील पहिले तीन चेंडू पॉवेलने षटकार खेचले. पाचव्या चेंडूवर पोवॉल १५ चेंडूंत ३६ धावांवर बाद झाला आणि राजस्थानने १५ धावांनी हा सामना जिंकला. दिल्लीला ८ बाद २०७ धावा करता आल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सजोस बटलर
Open in App