Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरची आणखी एक शतकी खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलर ( Jos Buttler ) आणि देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीने आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना हतबल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 08:58 PM2022-04-22T20:58:33+5:302022-04-22T21:41:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 DC vs RR Live Updates : Jos Buttler becomes only the 2nd player after Virat Kohli to score more than 2 centuries in an IPL season, smash 100 in 57 ball with 8 four and 8 sixes  | Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरची आणखी एक शतकी खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरची आणखी एक शतकी खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलर ( Jos Buttler ) आणि देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीने आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना हतबल केले. राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीरांनी वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. या दोघांनी १५ षटकांत १५५ धावा फलकावर चढवताना विक्रमी भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही सर्वोत्तम  भागीदारी ठरली. यापूर्वी बेन स्टोक्स व संजू सॅमसन यांनी २०२०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती. बटलरने यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खलिल अहमदने पहिले षटक अफलातून फेकले, परंतु राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने नशिबाने दोन चौकार कमावले. राजस्थानने सावध सुरूवात केली. कर्णधार संजू सॅमसन याचा हा RRकडून १००वा आयपीएल सामना आहे आणि अजिंक्य रहाणेनंतर राजस्थानकडून हे शतक पूर्ण करणारा पहिलाच खेळाडू आहे. मुस्ताफिजूर रहमानने टाकलेल्या चौथ्या षटकात देवदत्त पडिक्कलने सुरेख फटके मारले आणि त्या षटकात सलग तीन चौकारांसह १४ धावा चोपल्या. DC कर्णधार रिषभने चार षटकांत चार गोलंदाजांचा प्रयोग करून पाहिला. ६व्या षटकात पुन्हा अहमदला पाचारण करण्यात आले आणि यावेळेस बटलरची बॅट खणखणीत चालली. त्या षटकात १५ धावा कुटून बटलरने IPL 2022मध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला. 


यानंतर बटलरची बॅट तुफान चालली.. कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर यांनाही त्याने नाही सोडले आणि ३६ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पडिक्कलनेही तुफान फटकेबाजी केली आणि बटलर सह पहिल्या विकेटसाठी ११ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली. पडिक्कलनेही ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांची फटकेबाजी रोखण्यात दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला यश मिळत नव्हते अन् कर्णधार रिषभच्या चेहऱ्यावर ती हतबलता प्रकर्षाने दिसत होती. १५ षटकात १५५ धावा फलकावर चढवल्यानंतर खलिल अहमदने ही भागीदारी संपुष्टात आणली. खलिलने भन्नाट यॉर्कर टाकून पडिक्कलला LBW केले. रिषभचा DRS यशस्वी ठरला. पडिक्कलने ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा कुटल्या. ( Khaleel Ahmed breaks the 155-run opening stand. )

मपण, बटलरने ५७ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीत ८ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. आयपीएलच्या एका पर्वात ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराटनंतर दुसरा फलंदाज ठरला. शिखर धवननंतर सलग शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला. 


Web Title: IPL 2022 DC vs RR Live Updates : Jos Buttler becomes only the 2nd player after Virat Kohli to score more than 2 centuries in an IPL season, smash 100 in 57 ball with 8 four and 8 sixes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.