IPL 2022 Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Updates : नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर गुरुवारी महेंद्रसिंग धोनीची फिनिशर इनिंग्ज पाहायला मिळाल्यानंतर आज वानखेडे स्टेडिमवर जोस बटलरचे वादळ घोंगावले. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला असताना बटरलच्या ( Jos Buttler) आतषबाजीने क्रिकेट चाहते न्हाहून निघाले. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग दुसरे आणि एकूण तिसरे शतक बटलरने आज झळकावताना दिल्ली कॅपिटलस्लच्या गोलंदाजांनी धुलाई केली. १४ चेंडूंत ११ धावांवर असणाऱ्या बटलरने गिअर बदलला आणि ६५ चेंडूंत ११६ धावांची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत ९ चौकार व ९ षटकारांचा असा १८ चेंडूंत ९० धावांचा पाऊस पडला.
आयपीएलच्या एकाच पर्वात तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराट कोहलीनंतर ( ४ शतकं, २०१६) दुसराच फलंदाज ठरला. त्याने ख्रिस गेलचा एका पर्वतील २ शतकांचा विक्रम मोडला. आयपीएलच्या मागील ८ डावांतील त्याचे हे चौथे शतक ठरले. सावध सुरुवातीनंतर बटलर व देवदत्त पडिक्कल यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. बटलर व पडिक्कल यांनी ९१ चेंडूंत १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. पडिक्कलने ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा कुटल्या. त्यानंतर बटलरने शतक झळकावले. शिखर धवननंतर सलग शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला. बटलरने ६५ चेंडूंत ९ चौकार व ९ षटकारांनी ११६ धावांची खेळी केली. कर्णधार सॅमसननेही १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४६ धावा चोपल्या. राजस्थानने २ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलर ४९१ धावांसह खूप पुढे गेला आहे. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लोकेश राहुलच्या खात्यात २६५ धावा आहेत.
पाहा बटलरची इनिंग्ज...