Deepak Chahar, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर याच्या IPL खेळण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. CSK ने पहिले चारही सामने गमावल्यानंतर त्यांचा स्टार गोलंदाज संघात परतेल आणि संघ दमदार पुनरागमन करेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅब ट्रीटमेंट घेत असताना दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे तो यंदाचे IPL मध्ये न खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, दीपक चहर IPL 2022 मधून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी त्याच्या जागी CSKच्या संघात एका अनुभवी भारतीय खेळाडूला संधी देण्याचा पर्याय सुचवला आहे.
दीपक चहर गेल्या महिन्याभरापासून NCA मध्ये आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या भारताच्या T20 मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. चहर आयपीएलमधील पहिल्या टप्प्याला मुकेल, असे बोललं जात होते. पण आता नव्याने झालेल्या दुखापतीमुळे त्याचे IPL मध्ये खेळणे कठीणच मानले जात आहे. नवी दुखापत किती गंभीर स्वरूपाची आहे, याबाबत चेन्नई सुपर किंग्सला 'बीसीसीआय'कडून अद्याप औपचारिक अहवाल मिळालेला नाही. पण, या दरम्यान नेटकऱ्यांनी CSK ला इशांत शर्माचा पर्याय सुचवला आहे.
--
--
--
--
--
इशांत शर्माला IPL मधील ९३ सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे तो दीपक चहरच्या जागी चांगला पर्याय ठरू शकतो. इशांत शर्माने जेवढा वेळ क्रिकेट खेळला, त्यापैकी बराचसा काळ धोनी संघाचा कर्णधार होता. तसेच, गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना त्याची चांगली छाप पाडली होती. पण यंदाच्या लिलावात मात्र त्याच्यावर बोली लावली गेली नाही.