CSK in Big Trouble, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच फ्रँचायझींची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळतेय. काही संघांतील प्रमुख खेळाडू अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत, त्यात परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता आहे. अशात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) मोठ्या संकटात सापडलेले पाहायला मिळत आहेत.
दीपक चहर ( Deeapk Chahar ) व ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हे अद्याप दुखापतीतून सावरलेले नाहीत आणि त्यांच्या तंदुरूस्तीबाबत CSK कडेही कोणतेच अपडेट्स नाहीत. अशात आणखी एक खेळाडू आयपीएल २०२२च्या सुरूवातीच्या आठवड्याला मुकणार असल्याचे शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्णधार MS Dhoni ची डोकेदुखी वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा ड्वेन प्रेटोरियस (South African Dwaine Pretorius ) हा आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खेळू शकत नाही. सलामीवीर ऋतुराज व गोलंदाज दीपक यांनी पहिल्या आठवड्यातून आधीच माघार घेतली आहे. त्यात प्रेटोरियसची भर पडली आहे, परंतु त्याच्या न खेळण्यामागे दुखापत हे कारण नाही. ३२ वर्षीय प्रेटोरियसची बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. तीन सामन्यांची मालिका २३ मार्चला संपणार आहे आणि बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडूंना एका बायो बबलमधून आयपीएलच्या बायो बबलमध्ये आल्यावर किमान तीन दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे तो २६ मार्चला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत खेळू शकत नाही.
इथेच CSKची समस्या संपत नाही. तीन वन डे नंतर आफ्रिका दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि यात जर प्रेटोरियसची निवड झाली, तर तो १२ एप्रिलपर्यंत आयपीएल खेळू शकणार नाही. अशात तो किमान चार सामन्यांना मुकणार आहे. ५० लाख मुळ किमतीत या अष्टपैलू खेळाडूला चेन्नईने करारबद्ध केले.