रोहित नाईकमुंबई :
भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मोक्याच्या वेळी फलंदाजी कोलमडल्याने कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४४ धावांनी मोठा पराभव झाला. दिल्लीने फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करीत सामन्यावर एकहाती वर्चस्व राखले.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दिल्लीने ५ बाद २१५ धावांचा एव्हरेस्ट उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कोलकाताचा डाव १७१ धावांत गुंडाळत दिल्लीने शानदार विजय मिळवला. चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने ४ बळी घेत कोलकाताचे कंबरडे मोडले. खलील अहमदने ३, तर शार्दूल ठाकूरने २ बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी लढत देताना दमदार अर्धशतक झळकावले. तो बाद झाल्यानंतर दिल्लीने सामन्यावरील पकड घट्ट केली.
त्याआधी, पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार अर्धशतकी सलामीच्या जोरावर दिल्लीने द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. पृथ्वीने पुन्हा एकदा शानदार आक्रमण करताना स्फोटक खेळी केली. वॉर्नरनेही दमदार अर्धशतक झळकावताना आक्रमण आणि बचावाचा योग्य ताळमेळ साधला. पृथ्वी बाद झाल्यानंतर वॉर्नर-ऋषभ पंत यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर दिल्लीने १८ धावांत ४ फलंदाज गमावल्याने त्यांची १ बाद १४८ धावांवरून ५ बाद १६६ अशी घसरगुंडी उडाली.
अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनी जबरदस्त आक्रमण करीत संघाला दोनशेपलीकडे नेले. दोघांनी केवळ २० चेंडूंत ४९ धावांची भागीदारी करीत कोलकाताची गोलंदाज फोडून काढली.
१. अक्षर पटेलने आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. २. आयपीएलमध्ये १ हजार धावा आणि ९० हून अधिक बळी, अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल हा शेन वॉटसन, रवींद्र जडेजा आणि द्वेन ब्रावो यांच्यानंतर चौथा क्रिकेटपटू ठरला.३. कोलकाताविरुद्ध ७ अर्धशतक झळकावण्याच्या रोहित शर्माच्या कामगिरीशी वॉर्नरने केली बरोबरी. सुरेश रैनाने सर्वाधिक ८ अर्धशतके झळकावली आहेत. ४. पृथ्वी शॉने कोलकाताविरुद्ध गेल्या ७ डावांमध्ये पाचव्यांदा अर्धशतक झळकावले. ५. पृथ्वी शॉ दिल्लीकडून पॉवर प्लेमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारा वीरेंद्र सेहवागनंतर दुसरा फलंदाज ठरला. ६. आयपीएलमध्ये ५,५०० धावांचा टप्पा पार करणारा डेव्हिड वॉर्नर पहिला विदेशी फलंदाज ठरला.
मॅजिकल माेमेंट- कोलकाताच्या डावातील पहिल्या षटकातील पहिले तीन चेंडू नाट्यमय ठरले. पहिल्या दोन चेंडूंवर डीआरएस निर्णय घेण्यात आले. दोन्ही वेळा अजिंक्य रहाणे बाद होण्यापासून वाचला. तर तिसऱ्या चेंडूवर रहाणेच्या बॅटला स्पर्श करीत चेंडू यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. मात्र, यावेळी कोणीही अपील न केल्याने रहाणे पुन्हा वाचला.
धावफलकदिल्ली कॅपिटल्स :पृथ्वी शॉ गो. वरुण ५१, डेविड वॉर्नर झे. रहाणे गो. यादव ६१, ऋषभ पंत झे. यादव गो. रसेल २७, ललित यादव पायचीत नरेन १, रॉवमन पॉवेल झे. आर. के. सिंग गो. नरेन ८, अक्षर पटेल नाबाद २२, शार्दुल ठाकूर नाबाद २९, अवांतर १६, एकूण १० षटकांत ५ बाद २१५ धावा. बाद क्रम - १/९३, २/१४८, ३/१५१, ४/१६१, ५/१६६. गोलंदाजी : उमेश यादव ४-०-४८-१, रसीख सलाम १-०-१०-०, पॅट कमिन्स ४-०-५१-०, वरुण चक्रवर्ती ४-०-४४-१, सुनील नरेन ४-०-२१-२, आंद्रे रसेल २-०-१६-१, व्यंकटेश अय्यर १-०-१४-०कोलकाता नाईट रायडर्सअजिंक्य रहाणे झे. ठाकूर गो. अहमद ८, व्यंकटेश अय्यर झे.पटेल गो. अहमद १८, श्रेयस अय्यर यष्टिचीत पंत गो. कुलदीप यादव ५४, नितीश राणा झे. शॉ, गो. ललीत यादव ३०, आंद्रे रसेल झे. खान गो. ठाकूर २४, सॅम बिलिंग्स झे. ललीत यादव गो. अहमद १५, पॅट कमिन्स पायचीत गो. कुलदीप यादव ४, सुनील नरेन झे. पॉवेल गो. कुलदीप यादव ४, उमेश यादव झे. गो. कुलदीप यादव ०, रसीख सलाम झे. पॉवेल गो. ठाकूर ७, वरुण चक्रवर्ती नाबाद १, अवातंर ६, एकूण १९.४ षटकांत सर्वबाद १७१ धावा, बादक्रम - १/२१, २/३८, ३/ १०७, ४/११७, ५/१३३, ६/१३९, ७/१४३, ८/१४३, ९/१७०, १०/१७१.गोलंदाजी - मुस्तफिजूर ४-०-२१-०, शार्दुल ठाकूर २.४-०-३०-२, खलील अहमद ४-०-२५-३, अक्षर पटेल ३-०-३२-०, कुलदीप यादव ४-०-३५-४, रॉवमन पॉवेल १-०- १७-०, ललीत यादव १-०-८-१.चेन्नई : रॉबिन
मॅच हायलाईट्ससामनावीर : कुलदिप यादवनिर्णायक क्षण- कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक ठोकत कोलकाताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, १३व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तो यष्टिचीत झाला आणि सामना दिल्लीच्या बाजूने झुकला.