IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

मागील विजेता सीएसके जेतेपदाचा बचाव करण्यास मैदानात असेल, तर श्रेयस अय्यर प्रथमच केकेआरचे नेतृत्व करेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:10 AM2022-03-25T06:10:58+5:302022-03-25T06:13:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Dhoni has an army of all-rounders ‘Fitness is concern for kkr skipper Shreyas Iyer | IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी सीएसकेविरुद्ध केकेआर लढतीद्वारे होत आहे.  मागील विजेता सीएसके जेतेपदाचा बचाव करण्यास मैदानात असेल, तर श्रेयस अय्यर प्रथमच केकेआरचे नेतृत्व करेल. या दोन संघांची बलस्थाने, उणिवा, संधी आणि धोका यांचा वेध घेऊया...

सीएसकेकडे अष्टपैलूंची फाैज : सीएसके संघात रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोईन अली आणि ड्वेन ब्रावो अशी नावे आहेत. गोलंदाज आणि फलंदाज सामना फिरवू शकतात. जडेजा आणि ब्राव्हो हे मॅचविनर आहेत. याशिवाय फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणारा राजवर्धन हंगरगेकर या संघात आहे. 

भेदक वेगवान मारा : या संघात स्विंग तज्ज्ञ दीपक चाहर, ब्राव्हो आणि ॲडम मिल्ने अशी नावे आहेत.  चाहर आणि मिल्ने हे डेथ ओव्हरमध्ये धावा रोखू शकतात.  

संधी :  सीएसकेने सर्वाधिक नऊ वेळा (२००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५,२०१८, २०१९ आणि २०२०) फायनल खेळले. यादरम्यान चारवेळा २०१०,२०११,२०१८ आणि २०२१ ला जेतेपदावर नाव कोरले. संघातील खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघ किमान प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो. जडेजाचे नेतृत्व आणि त्याचा सर्वोत्कृष्ट फाॅर्म अन्य  संघांसाठी डोकेदुखी ठरू शकेल. 

अनुभवी लेगस्पिनरची उणीव : संघाकडे रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे ऑफ ब्रेक गोलंदाज आहेत, मात्र एकही चांगला लेग स्पिनर नाही.  आयपीएलमध्ये लेगस्पिनर्सची कामगिरी निर्णायक ठरते. युजवेंद्र चहल आणि राशिद खान हे सर्वांत मोठे उदाहरण. चेन्नईकडे मागच्या सत्रात पीयूष चावला हा अनुभवी लेगस्पिनर होता. यंदा असा एकही गोलंदाज संघात नाही.

धोका : धोनीचा खराब फॉर्म सर्वांत मोठा अडसर असेल. डेथ ओव्हर्समधील त्याची मंद फलंदाजी संघाला मागे ओढते.  धोनीच्या मंद धावगतीमुळे संघातील अन्य सहकाऱ्यांवर दडपण येते.  यावेळीदेखील संघात धोनीसह  मोईन अली, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा हे अधिक वयाचे खेळाडू आहेत.

केकेआरकडे कमालीचे ‘पॉवर हिटर’ : केकेआरच्या फलंदाजीत विविधता आहे. या संघात कमालीचे पॉवर हिटर आहेत. आक्रमक आणि मधल्या फळीत सरस असे फलंदाज असल्याने भरपूर धावा काढू शकतील. आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि व्यंकटेश  अय्यरसारखे पॉवर हिटर आहेत. तिन्ही खेळाडू मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जात असून टी-२० त त्यांचा स्ट्राईक रेट शानदार आहे.

यष्टिरक्षकाची उणीव : केकेआरने लिलावात केवळ दोन यष्टिरक्षक खरेदी केले. शेलत्रडन जॅक्सन आणि सॅम बिलिंग्स हे दोघेही मधल्या फळीत फलंदाजी करतील.  बिलिंग्स टी-२० तज्ज्ञ आहे. मात्र तो फिटनेस टिकवेल का? जॅक्सन हा टी-२० तज्ज्ञ मानला जात नाही.  दोघांपैकी एक जखमी झाला किंवा ऑफ फॉर्म असेल, तर बाहेर बसेल. याचा विपरित परिणाम संघाच्या कामगिरीवर होण्याची भीती आहे.

संधी : आयपीएल ५ मध्ये श्रेयस अय्यरच्या रूपाने संघाला चांगला कर्णधार लाभला. अय्यरने दिल्ली संघाला फायनलमध्ये पोहोचविले होते.  मागच्या काही महिन्यांपासून श्रेयसची बॅट तिन्ही प्रकारात तळपली. केकेआर अय्यरच्या प्रतिभेचा पूरेपूर उपयोग करून घेऊ इच्छितो. 
फिरकी गोलंदाज फॉर्ममध्ये नाहीत : केकेआरच्या सर्वात अधिक चिंतेचा विषय सध्याच्या फिरकीपटूंचा फॉर्म. वरुण चक्रवर्तीे आणि सुनील नरेन यांची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून ढेपाळली.

धोका : केकेआरचा सर्वांत बलाढ्य खेळाडू आंद्रे रसेल हा फिटनेसमुळे संघासाठी मोठा अडसर ठरू शकतो. तो मागील काही महिन्यांपासून फिट नाही. याशिवाय सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती हे सतत जखमी होत असतात. स्पर्धेदरम्यान यातील एखादा खेळाडू जरी बाहेर गेला, तर श्रेयसच्या अडचणींमध्ये भर पडू शकते.

Web Title: IPL 2022: Dhoni has an army of all-rounders ‘Fitness is concern for kkr skipper Shreyas Iyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.