नवी दिल्ली : आयपीएल १५मध्ये यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक कमाल करीत आहे. आरसीबीसाठी तो फिनिशरची भूमिका बजावताना दिसतो. २०४.५५ च्या स्ट्राइक रेटने त्याने ९० धावा केल्या असून तो अद्याप बाद झालेला नाही.
भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने वयाच्या ३६व्या वर्षी दिनेश कार्तिक भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी टी-२० विश्वचषकात कार्तिक उपयुक्त ठरेल,’ असे आकाशचे मत आहे.
दिनेशमध्ये अद्याप क्रिकेट शिल्लक आहे. वाढते वय हा मुद्दा नाहीच. एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याचे वय अडथळा कसे काय ठरू शकेल? विशेष असे की कार्तिक ज्या स्थानावर फलंदाजी करतो तीच तर टीम इंडियाची गरज आहे. दुसरीकडे कार्तिकचे प्रतिस्पर्धी खेळाडू काेण? हेदेखील विचारात घ्यावे लागेल. दीपक हुडा हा आणखी एक दावेदार आहे, कारण तो ऑफ स्पिन गोलंदाजीदेखील करतो. तथापि कार्तिक असाच खेळत राहिल्यास टीम इंडियात स्थान मिळवू शकतो.’ आरसीबीने यंदा जे तिनही सामने जिंकले त्यात कार्तिकची कामगिरी अधोरेखित झाली आहे.