रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला क्वालिफायर २ मध्ये गाशा गुंडाळावा लागला. पण, त्यांच्या संघात यंदा दाखल झालेल्या दिनेश कार्तिकने ( Dinesh Karhik) हे पर्व मॅच फिनिशर म्हणून गाजवले. आयपीएल २०२२मधील दमदार कामगिरीच्या जोरावरच कार्तिकने तब्बल तीन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन केले. त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात निवडले आहे. आयपीएल २०२२मध्ये RCBच्या दिनेश कार्तिकने 'सुपर स्ट्रायकर ऑफ दी सीजन' पुरस्कार पटकावला आणि त्याला टाटा पंच गाडी बक्षीस म्हणून मिळाली.
दिनेश कार्तिकने यंदाच्या पर्वात १६ सामन्यांत ५५ च्या सरासरीने आणि १८३.३३च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या. १६ डावांत तो १० वेळा नाबाद राहिला आणि एक अर्धशतक झळकावले. नाबाद ६६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
IPL 2022 Awards List:
- विजेता - गुजरात टायटन्सन - २० कोटी
- उप विजेता - राजस्थान रॉयल्स - १२.५ कोटी
- ऑरेंज कॅप विजेता - जोस बटलर ( ८६३ धावा) - १० लाख
- पर्पल कॅप विजेता - युजवेंद्र चहल ( २७ विकेट्स) - १० लाख
- सर्वाधिक षटकार - जोस बटलर ( ४५ ) - १० लाख
- Most Valuable Player - जोस बटलर - १० लाख
- Emerging Player of the Year - उम्रान मलिक - ( २२ विकेट्स) - २० लाख
- Game-changer of the season - जोस बटलर ( १३१८ गुण) - १० लाख
- Super striker of the season - दिनेश कार्तिक - टाटा पंच गाडी
- Power player of the season - जोस बटलर - १० लाख
- Fairplay award - राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स
- सर्वाधिक चौकार - जोस बटलर ( ८३) - १० लाख
- Fastest delivery of the season- ल्युकी फर्ग्युसन - १० लाख
- Catch of the season - एव्हिन लुईस - १० लाख