नवी दिल्ली: आयपीएल हे युवा खेळाडूंसाठी सर्वोत्तम व्यासपीठ मानले जाते. आयपीएलमध्ये आल्यानंतर खेळाडू आपली अनेक स्वप्ने घेऊन संपूर्ण देशात आपला ठसा उमटवतात. यंदाच्या मेगा लिलावातही अनेक युवा खेळाडूंचे नशीब उघडले आणि संघांनी त्यांना मोठी रक्कम मोजून खरेदी केले. आयपीएल 2022 मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने 19 वर्षीय खेळाडूला 1.70 कोटी रुपयांना विकत घेतले. या खेळाडूचे वडील इलेक्ट्रिशियन असून, या तरुण खेळाडूला त्याच्या पहिल्या IPL कमाईने वडिलांसाठी घर खरेदी करायचे आहे.
इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला क्रिकेटर
मेगा लिलावात 19 वर्षीय टिळक वर्माचे नाव अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत आले आणि मुंबईने लिलावात सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला मागे टाकत या खेळाडूला 1.7 कोटी रुपयांना विकत घेतले. टिलक वर्मा 2020 च्या अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग होता. टिलकचे वडील हैदराबादमध्ये इलेक्ट्रिशियन आहेत. तिलक वर्माने विजय हजारे ट्रॉफी 2021-22 मध्ये हैदराबादकडून खेळताना पाच सामन्यांमध्ये 180 धावा केल्या आणि चार विकेटही घेतल्या. वर्मा, इतर अनेकांप्रमाणे सचिन तेंडुलकरचा खूप मोठा चाहता आहे.
टिळकला पहिल्या कमाईने घर घ्यायचे आहे
टिळक वर्माने दैनिक भास्करशी संवाद साधला आणि त्यात त्यांने पुढील योजना आणि त्याच्या कुटुंबाच्या परिस्थितीबद्दल सांगितले. टिळकने सांगितले की, त्याचे वडील इलेक्ट्रिशियन असून, त्यांना घराचा खर्च भागवणेही खूप कठीण आहे. त्याच्याकडे स्वतःचे घरदेखील नाही. टिळकला अजून एक भाऊ असून, मोठ्या भावाला अभ्यासात करिअर करायचे होते, तर त्याला क्रिकेटर व्हायचे होते. दोघांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वडिलांनी अनेक त्याग केले. आता आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशातून त्याला वडिलांसाठी हैदराबादमध्ये घर घ्यायचे आहे.
टिळक वर्माची क्रिकेट कारकीर्द
टिळक वर्मा 2020 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळला होता. टिळकने 4 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 31.87 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. याशिवाय, टिळकने 16 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत. लिस्ट ए मध्ये टिळकने 52.36 च्या सरासरीने 784 धावा केल्या आहेत आणि 15 टी -20 सामन्यांमध्ये 29.30 च्या सरासरीने 381 धावा केल्या आहेत. गेल्या मोसमातील सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये 147.26 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या.
Web Title: IPL 2022: Electrician's Son Becomes Millionaire, mumbai indians took Tilak Varma for 1.7 cr
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.