Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या एलिमिनेटर लढतीत रजत पाटीदारची ( Rajat Patidar) आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:48 PM2022-05-25T21:48:13+5:302022-05-25T22:21:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Maiden IPL century by Rajat Patidar, from 49 balls in the Eliminator of IPL 2022 | Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या एलिमिनेटर लढतीत रजत पाटीदारची ( Rajat Patidar) आतषबाजी पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली व ग्लेन म‌ॅक्सवेल या भरवशाच्या खेळाडूंना अपयश आले. पण, युवा फलंदाज रजतने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना चोपून काढले. मोक्याच्या क्षणी लखनौच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला जीवदानही दिले. लखनौच्या गोलंदाजांनी आज दिशाहीन गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा उचण्यात रजत कुठेच चुकला नाही. नशिबाचीही RCB विशेषतः रजतला साथ मिळाली. 

मोहसिन खानने पहिल्याच षटकात  RCBला धक्का देताना कर्णधार फ‌ॅफ ड्यू प्लेसिसला गोल्डन डकवर माघारी पाठवले. आयपीएल प्ले ऑफमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा फॅफ तिसरा कर्णधार ठरला. विराटने मिड ऑनला मारलेला चौकार पाहून BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीही ( Sourav Ganguly) भारी खूश झाला.  विराटने या लढतीत  ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचला मागे टाकन पाचवे स्थान पटकावले.  कृणाल पांड्याने टाकलेल्या 6व्या षटकात रजत पाटीदारने 4,4,6,4 अशा 20 धावा चोपल्या. RCB ने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. त्याने विराटसह 33 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात रजतच्या 35 धावा होत्या. रजत तुफान फटकेबाजी करत होता, विराटने विकेट टिकवून खेळण्याचा प्रयत्न केला. 46 चेंडूंत 66 धावांची भागीदारी आवेश खानने संपुष्टात आणली. विराट 25 धावांवर बाद झाला. 

रजतने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलला 9 धावांवर कृणाल पांड्याने माघारी पाठवले. 59 धावांवर रजतला जीवदान मिळाले. रजतने चौथ्या विकेटसाठी महिपाल लोम्रोरसह ( 14) 27 धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईच्या त्याच षटकात दिनेश कार्तिक अम्पायर कॉलमुळे वाचला. लोकेश राहुलने 15व्या षटकात कार्तिकचा झेल टाकला. आज नशीब RCBच्या बाजूने होतं, 16व्या षटकात दीपक हुडाकडून रजतचा झेल सुटला अन् चौकार मिळाला. बिश्नोईच्या त्या षटकात रजतने ( 6,4,6,4,6)  26 धावा चोपल्या. दिनेश कार्तिकनेही फटकेबाजीला सुरूवात केली. रजत व कार्तिकने 24 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 93 धावांवर पुन्हा रजतचा झेल सोडला. त्यानंतर त्याने षटकार मारून आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. 49 चेंडूंत त्याने ही शतकी खेळी केली. 

Web Title: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Maiden IPL century by Rajat Patidar, from 49 balls in the Eliminator of IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.