IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील LSG vs RCB या एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे सामना 10 मिनिटे उशीराने सुरु झाला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कृणाल पांड्या व दुष्मंथा चमिरा यांचे कमबॅक, जेसन होल्डर व के गौथम हे बाहेर झाले आहेत. बंगळुरूच्या ताफ्यात मोहम्मद सिराज परतला आहे. लखनौने पहिल्याच षटकात बंगळुरूचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसची विकेट मिळवली. पण, रजत पाटीदार व विराट कोहलीने RCBच्या डावाला आकार दिला.
मोहसिन खानने पहिल्याच षटकात RCBला धक्का देताना कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला गोल्डन डकवर माघारी पाठवले. आयपीएल प्ले ऑफमध्ये गोल्डन डकवर बाद होणारा फॅफ तिसरा कर्णधार ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनी ( 2015) व रोहित शर्मा ( 2020) हे गोल्डन डकवर बाद झाले होते. पण, विराट कोहली व रजत पाटीदार सुसाट खेळले. विराटने मिड ऑनला मारलेला चौकार पाहून BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीही ( Sourav Ganguly) भारी खूश झाला. कॅमेरामनने त्याचवेळी त्याच्याकडे कॅमेरा वळवला.
विराटने या लढतीत एक मोठा विक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्याने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचला मागे टाकन पाचवे स्थान पटकावले. ख्रिस गेल ( 14562), शोएब मलिक ( 11698) , किरॉन पोलार्ड ( 11571), डेव्हिड वॉर्नर ( 10740) आणि विराट कोहली ( 10586) असे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. कृणाल पांड्याने टाकलेल्या 6व्या षटकात रजत पाटीदारने 4,4,6,4 अशा 20 धावा चोपल्या. RCB ने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. त्याने विराटसह 33 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात रजतच्या 35 धावा होत्या. ( पाहा IPL 2022 - Eliminator RCB vs LSG सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू - फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोम्रोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज ( Royal Challengers Bangalore 1 Faf du Plessis (capt.), 2 Virat Kohli, 3 Rajat Patidar, 4 Glenn Maxwell, 5 Mahipal Lomror, 6 Dinesh Karthik (wk), 7 Shahbaz Ahmed, 8 Wanindu Hasaranga, 9 Harshal Patel, 10 Josh Hazlewood, 11 Mohammed Siraj)