Join us  

IPL 2022 Eliminator RCB vs LSG : आनंदवार्ता!; पाऊस थांबला, जाणून घ्या सामना किती वाजता सुरू होणार, किती षटकं खेळवली जाणार

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 7:53 PM

Open in App

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर आले, परंतु सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पावसाने त्यांचे स्वागत केले. त्यामुळे नाणेफेक न होताच, दोन्ही संघ पेव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आणि पावसाचा जोरही वाढला होता. पण, आता पाऊस थांबला असून BCCI ने नाणेफेकीची नवीन वेळ आणि सामना कधी सुरू होणार जाहीर केली आहे. 7.55 वाजता नाणेफेक होणार, 8.10 ला पहिला चेंडू फेकला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सामन्यात पुन्हा पावसाने खोडा घातला तर काय?रात्री 9.40 वाजेपर्यंत सामना सुरू झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20-20 षटकं खेळण्यास मिळणाररात्री 11.56 वाजल्यानंतर 5-5 षटकांचा सामनामध्यरात्री 12.50 वाजल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये लागणार निकाल.   

20-20 षटकांचा सामना न झाल्यास 5-5 षटकांची मॅच होईल. तेही शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. तेही शक्य नसल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता ठरवला जाईल, अशात लखनौ सुपर जायंट्स एलिमिनेटरसाठी पात्र ठरेल.   

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App