Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आयपीएल 2022त दाखल झालेल्या रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज विक्रमांचा पाऊस पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:15 AM2022-05-26T00:15:01+5:302022-05-26T00:32:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar smashed century, RCB have advanced to Qualifier 2 | Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आयपीएल 2022त दाखल झालेल्या रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज विक्रमांचा पाऊस पाडला. प्ले ऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला, एलिमिनेटरमध्ये शतक करणारा तो पहिलाच खेळाडू  आणि अनकॅप्ड खेळाडूची ही सर्वात जलद सेंच्युरी ठरली आहे. दिनेश कार्तिक अन् त्याची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. लखनौ सुपर जायंट्सनेही ( LSG ) अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. हर्षल पटेलने ( Harshal Patel) उल्लेखनीय गोलंदाजी करून RCBला विजय मिळवून दिला. कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहूनही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता क्वालिफायर 2 मध्ये RCBला राजस्थान रॉयल्सचा सामना करायचा आहे. 

पहिल्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसची विकेट मिळाल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी दबदबा राखायला हवा होता. त्यात त्यांनी विराट कोहली ( 25) व ग्लेन मॅक्सवेल ( 9) या स्टार फलंदाजांनाही लवकर माघारी पाठवले. पण, रजतने त्यांच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला. सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी करून त्याने लखनौला ब‌ॅकफूवर फेकले. त्यात लखनौचा कर्णधार लोकेश राहुलपासून ते अनेक खेळाडूंनी सोपे सोपे झेल टाकून रजत व कार्तिकला जीवदान दिले. रजतने दुसऱ्या विकेटसाठी विराटसह 46 चेंडूंत 66, मॅक्सवेलसह 16, महिपाल लोम्रोरसह 29 आणि कार्तिकसह 41 चेंडूंत नाबाद 92 धावांची भागीदारी केली. 


रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रजतने  54 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावांची खेळी केली. त्याला दिनेश कार्तिकची ( Dinesh Karthik) दमदार साथ मिळाली. या दोघांनी 41 चेंडूंत 92 धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिक 23 चेंडूंत 37 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने 4 बाद 207 धावा केल्या.आयपीएलच्या मध्यंतराला तो रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून RCBच्या ताफ्यात दाखल झाला. 

प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉक ( 6) व मनन वोहरा ( 19) यांना अनुक्रमे मोहम्मद सिराज व जोश हेझलवूडने माघारी पाठवले. कर्णधार लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी सावध खेळ करताना संघाचा संघर्ष सुरू ठेवला होता. लखनौच्या खेळाडूंनी केलेल्या चुका RCBने टाळल्या. उत्तम क्षेत्ररक्षण, अचूक मारा करून त्यांनी लखनौवर दडपण वाढवले होते. 12 षटकांत RCBच्या 102 धावा होत्या,  तर लखनौनेही तो टप्पा गाठला होता. पण, त्यांना पुढील 8 षटकांत जवळपास 14च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. लोकेश व दीपकने अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशने 43 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.


स्ट्रॅटेजिक टाईम आऊटनंतर लखनौच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोश हेझलवूडच्या 14व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले गेले. त्यानंतर वनिंदू हसरंगाला टार्गेट करून दीपकने दोन उत्तुंग षटकार खेचले. पण, चौथ्या चेंडूवर हसरंगाने त्रिफळा उडवला. दीपक 26 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह 45 धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिसने आल्याआल्या सिक्स मारला. आता लखनौला 30 चेंडूंत 65 धावा करायच्या होत्या. सिराजने 16व्या षटकात 10 धावा दिल्या. लोकेशने सलग तिसऱ्या पर्वात 600+ धावा केल्या.  हसरंगाने टाकलेल्या 17व्या षटकात 14 धावा आल्याने लखनौला 18 चेंडूंत 41 धावा करायच्या होत्या. हर्षल पटेलची ओव्हर निर्णायक ठरणारी होती, कारण त्याने आधीच्या दोन षटकांत केवळ 8 धावा दिल्या होत्या. 
हर्षलने त्या षटकात पहिली दोन चेंडू व्हाईड फेकली अन् त्यात चौकारही मिळाला. पण, त्यानंतर दोन निर्धाव चेंडू टाकून तिसऱ्या चेंडूवर हर्षलने LSGच्या मार्कस स्टॉयनिसची ( 9) विकेट घेतली. इथे सामना फिरला अन् RCB ने विजयाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले. हर्षलने 18व्या षटकात 8 धावा देत एक विकेट घेतली. LSGला 12 चेंडूंत 33 धावांची गरज होती. लोकेशचा संथ खेळ लखनौच्या चाहत्यांना आणखी चिडचिडा करत होता. हातात विकेट असूनही त्याच्याकडून फटकेबाजी होतच नव्हती. जोश हेझलवूडने 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लोकेशला बाद केले. त्याने 58 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांसह 79 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर कृणाल पांड्या गोल्डन डकवर बाद झाला.  

6 चेंडूंत 24 धावा लखनौला करायच्या होत्या आणि दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर होते. हर्षलने पुन्हा एकदा तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असल्याचे सिद्ध केले आणि आरसीबीला जिंकून दिले. दुष्मंथा चमिराने षटकार खेचून विराट कोहलीचं टेंशन वाढवलं होतं, परंतु हर्षलने चांगले कमबॅक केले. आरसीबीने 14 धावांनी सामना जिंकला. लखनौला 6 बाद 193 धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar smashed century, RCB have advanced to Qualifier 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.