IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रजतने 54 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावांची खेळी करून RCBला दोनशेपार धावसंख्या उभारून दिली. त्याला दिनेश कार्तिकची ( Dinesh Karthik) दमदार साथ मिळाली. या दोघांनी 41 चेंडूंत 92 धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिक 23 चेंडूंत 37 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने 4 बाद 207 धावा केल्या.
कोण आहे रजत पाटीदार?आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये रजत पाटीदार अनसोल्ड राहिला होता. मध्यप्रदेशातील बिझनेसमन कुटूंबात त्याचा जन्म... वयाच्या 8व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि तेही त्याच्या आजोबांच्या क्रिकेट अकादमीत. गोलंदाज म्हणून त्याने कारकीर्दिला सुरुवात केली. पण 15 वर्षांखालील स्पर्धेनंतर त्याने फलंदाज बनण्याचे ठरवले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 40.43च्या सरासरीने 2588 धावा, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1397 धावा आणि ट्वेंटी-20त 31च्या सरासरीने 1024 धावा त्याच्या नावावर आहेत.
आयपीएलच्या मध्यंतराला तो रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून RCBच्या ताफ्यात दाखल झाला. आज त्याने प्ले ऑफमध्ये आऱसीबीकडून शतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. एलिमिनेटरमध्ये शतक करणारा तो पहिलाच खेळाडू आहे आणि अनकॅप्ड खेळाडूची ही सर्वात जलद सेंच्युरी ठरली आहे.
पाहा व्हिडीओ...