IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये आज एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा मुकाबला करण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी रवाना होणार आहे. पण, आजची ही लढत पावसामुळे रद्द झाल्यास काय?
क्वालिफायर 1 लढतीवरही पावसाचे सावट होते, परंतु प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेव्हा पाऊस गायब झाला आणि पूर्ण सामना पाहयला मिळाला. एलिमिनेटर सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. accuweather.com या पोर्टलनुसार 25 मे म्हणजे आज कोलकाता शहरातील तापमान हे दिवसा 34 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि रात्री ते 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. दुपारी येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दिवसा पाऊस पडण्याची शक्यता ही 65% इतकी आहे, परंतु रात्री 4% इतकीच शक्यता आहे. त्यामुळे इडन गार्डनवर दिवसा पाऊस पडू शकेल, परंतु मॅच सुरू होण्याच्या वेळेस मोकळे आकाश राहणार आहे.
दिवसा पाऊस पडणार असल्यामुळे ओली खेळपट्टी ही दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरू शकते. पण, जर ही मॅच झालीच नाही तर, निकाल कसा लागेल. 20-20 षटकांचा सामना न झाल्यास 5-5 षटकांची मॅच होईल. तेही शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. तेही शक्य नसल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता ठरवला जाईल, अशात लखनौ सुपर जायंट्स एलिमिनेटरसाठी पात्र ठरेल.
Web Title: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : RCB vs LSG Weather Forecast: What happens if Eliminator gets washed out?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.