IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये आज एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:13 PM2022-05-25T19:13:00+5:302022-05-25T19:13:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Eliminator RCB vs LSG : The toss has been delayed by the drizzle. Covers are coming on, Who will go to Qualifier 2 if there is no match? | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये आज एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा मुकाबला करण्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी रवाना होणार आहे. पण, LSG vs RCB सामन्यात पावसाने व्यत्यय निर्माण केले आहे आणि त्यामुळे नाणेफेक विलंबाने होणार आहे. सोसाट्याच्या वारा आणि रिमझिम पावसामुळे खेळपट्टीवर पुन्हा कव्हर टाकण्यात आले आहेत.


क्वालिफायर 1 लढतीवरही पावसाचे सावट होते, परंतु प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेव्हा पाऊस गायब झाला आणि पूर्ण सामना पाहयला मिळाला. एलिमिनेटर सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  accuweather.com या पोर्टलनुसार 25 मे म्हणजे आज कोलकाता शहरातील तापमान हे दिवसा 34 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि रात्री ते 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. दुपारी येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दिवसा पाऊस पडण्याची शक्यता ही 65% इतकी आहे, परंतु रात्री 4% इतकीच शक्यता होती, पण, नाणेफेक होण्याआधीच पाऊस पडला. 

20-20 षटकांचा सामना न झाल्यास 5-5 षटकांची मॅच होईल. तेही शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. तेही शक्य नसल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता ठरवला जाईल, अशात लखनौ सुपर जायंट्स एलिमिनेटरसाठी पात्र ठरेल.   

Web Title: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : The toss has been delayed by the drizzle. Covers are coming on, Who will go to Qualifier 2 if there is no match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.