IPL 2022 Closing Ceremony : २०१८नंतर प्रथमच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स ( Gujarat Titans (GT) and Rajasthan Royals (RR) ) यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे. या लढतीआधी हा समारोप समारंभ होणार असून यात दिग्गज गायक ए आर रहमान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांचे परफॉर्मन्स होणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत १ लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) हेही उपस्थित राहणार असल्याने स्टेडियमला छावणीचे स्वरूप येणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जवळपास ६००० पोलिस अधिकारी असणार आहेत.
- सायंकाळी ६.३० वाजल्यापासून या समारोह समारंभाला सुरूवात होणार आहे. तासभर हा समारंभ झाल्यानंतर ७.३० वाजता टॉस होईल आणि ८ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
- या समारंभात ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि गायक नीती मोहन यांचेही परफॉर्मन्स होणार आहेत.
- रणवीर सिंगही या कार्यक्रमासाठी कसून मेहनत घेत आहे आणि आयपीएलने त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
- स्टार परफॉर्मन्स व्यतिरिक्त या समारंभात झारखंडचे पारंपरिक छऊ नृत्यही सादर केले जाणार आहे. प्रभात कुमार यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्य हे छऊ नृत्य सादर करणार आहेत.