IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या ( RR) अंगलट आला. गुजरात टायटन्सचा ( GT) कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्यांना तालावर नाचवले. त्याने गुजरातच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेतलाच, शिवाय स्वतः भन्नाट स्पेल टाकला. हार्दिकने ४ षटकांत १७ धावा देताना ३ मोठ्या विकेट्स घेतल्या. गुजरातच्या अन्य गोलंदाजांनीही सुरेख कामगिरी करताना राजस्थानच्या धावांवर चाप बसवला.. ल्युकी फर्ग्युसनने आयपीएल २०२२मधील ( 157.3 kmph) सर्वात वेगवान चेंडू टाकला आणि आयपीएल इतिहासातील हा दुसरा जलद चेंडू ठरला.
संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. चौथ्या षटकात यशस्वी ( २२) झेलबाद झाला. ९व्या षटकात
हार्दिक पांड्याने गुजरातला मोठी विकेट मिळवून दिली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन १४ धावा करून माघारी परतला. साई किशोरनचे दुसरी कॅच घेतली. हार्दिकने त्या षटकात १ धाव देत १ विकेट घेतली. आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत फक्त कर्णधार अनिल कुंबळेला विकेट घेता आली होती. आज हार्दिक पांड्याने त्या पंक्तित स्थान पटकावले. राजस्थानवर दडपण निर्माण करण्यासाठी हार्दिकने चेंडू पुन्हा शमीकडे दिला, परंतु बटलरने त्या षटकात ११ धावा चोपून आणखी एक विक्रम नावावर केला.
आयपीएलच्या एका पर्वात ८५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर पहिलाच फलंदाज ठरला. त्याने डेव्हिड वॉर्नरने २०१६मध्ये नोंदवलेला ८४८ धावांचा विक्रम मोडला. विराटने एका पर्वात ९७३ धावा केल्या होत्या. १२व्या षटकात राशिद खानने RRच्या देवदत्त पडिक्कलला ( २) बाद केले आणि पुढच्याच षटकात हार्दिकने महत्त्वाची विकेट घेतली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३९ धावांवर बाद झाला. बटलरने आयपीएल २०२२त ४ शतकं व ४ अर्धशतकासह ८६३ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यात गुजरातला फार कष्ट घ्यावे लागले नाही. हार्दिकने त्याच्या चौथ्या षटकात शिमरोन हेटमायरला ( ११) बाद केले. त्यानंतर साई किशोरने RRच्या आऱ अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) यांना माघारी पाठवले. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या.
हार्दिक पांड्याने घेतलेली विकेट पाहा...
Web Title: IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Gujarat Titans need 131 to win IPL 2022 and create history in front of 1,04,859 people.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.