Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Hardik Pandya has won his 5th IPL title out of 5. Only Rohit Sharma has won more

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:04 AM2022-05-30T00:04:05+5:302022-05-30T00:04:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Hardik Pandya has won his 5th IPL title out of 5. Only Rohit Sharma has won more | Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम

Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. दोन जीवदान मिळालेल्या शुबमन गिलने ( Shubman Gill) नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा करून गुजरातचा सहज विजय निश्चित केला. या विजयासह  हार्दिक पांड्याने सर्वाधिक आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले. रोहित शर्मा ६ जेतेपदांसह अव्वल स्थानावर आहे. 


राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. हार्दिकने ४ षटकांत १७ धावा देताना ३ मोठ्या विकेट्स घेतल्या. यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २)  हे झटपट बाद झाल्याने जोस बटलरवरील दडपण वाढले होते. हार्दिकने त्याला ( ३९)  बाद केले. हार्दिकने स‌‌‌‌ॅमसन, बटलर यांच्यानंतर शिमरोन हेटमायरला ( ११) बाद केले. साई किशोरने RRच्या आऱ अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) यांना माघारी पाठवले. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 


प्रत्युत्तरात ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात शुबमन गिलला जीवदान मिळाले, युजवेंद्र चहलने सोपा झेल सोडला. पण, वृद्धीमान साहा ( ५) लगेच बाद झाला. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. चहलने टाकलेल्या ८व्या षटकात शिमरोन हेटमायरने परतीचा कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.  RRचा कर्णधार संजूने १० षटकं झाली तरी आर अश्विनची ४ षटकं राखून ठेवली होती. १२व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला. पण, हार्दिकने अश्विनचे चौकार-षटकारांनी स्वागत केले. हार्दिक व शुबमनने ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला.

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. या विजयासह  सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे. रोहित, महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांच्यानंतर हार्दिक हा आयपीएल जेतेपद पटकावणारा चौथा कर्णधार आहे. त्याने २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून जेतेपदाचा चषक उंचावला होता अन् २०२२मध्ये त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली. रोहितच्या नावावर ५ जेतेपदं आहेत, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांच्याही नावावर प्रत्येकी ५ जेतेपदं आहेत. महेंद्रसिंग धोनी व लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी ४ वेळा ही कामगिरी केली आहे. 

Web Title: IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Hardik Pandya has won his 5th IPL title out of 5. Only Rohit Sharma has won more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.