IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती, असे नाणेफेकीनंतर सांगितले. त्याचे यश त्यांचा चौथ्याच षटकात मिळाले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल बाद झाला, परंतु जोस बटलरने ( Jos Buttler ) इतिहास रचला. ( IPL 2022 Finals RR vs GT सामन्याचा धावफलक एका क्लिकवर )
राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युजवेंद्र चहल
गुजरात टायटन्स - वृद्धीमान साहा, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, साई किशोर, ल्युकी फर्ग्युसन ( अल्झारी जोसेफच्या जागी संघात), यश दयाल, मोहम्मद शमी कोणत्या खेळाडूची कितवी आयपीएल फायनल?
- हार्दिक पांड्या - ५ ( 2015, 2017, 2019, 2020, 2022)
- आर अश्विन - ३ ( 2010, 2011, 2022 )
- ट्रेंट बोल्ट - ३ ( 2016, 2020, 2022 )
- युझवेंद्र चहल - २ ( 2013, 2022)
- जोस बटलर - २ ( 2017, 2022)
- वृद्धीमान साहा - २ ( 2011, 2022)
- अल्झारी जोसेफ - १ ( 2019)
यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकात २ धावा आल्यानंतर यश दयालच्या दुसऱ्या षटकात बटलरने सुरेख चौकार खेचला. यशस्वीने तिसऱ्या षटकात शमीला चौकार-षटकार खेचून १४ धावा काढल्या. चौथ्या षटकात यशस्वीने खणखणीत षटकात खेचला, परंतु पुन्हा तोच फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. यश दयालने गुजरातला पहिले यश मिळवून देताना १६ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या यशस्वीला माघारी पाठवले. जोस बटलर दुसऱ्या टोकाला संयमी खेळ करत होता आणि त्याने विक्रमी कामगिरीची नोंद केली. आयपीएलच्या बाद फेरीत २०० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने क्वालिफायर १ मध्ये ८९ आणि क्वालिफायर २ मध्ये नाबाद १०६ धावा केल्या होत्या आणि आज त्याने पाचवी धाव घेताच हा विक्रम झाला. यापूर्वी २०१६मध्ये डेव्हिड वॉर्नरने १९० धावा केल्या होत्या.
एकाच पर्वात प्ले ऑफमध्ये सर्वाधिक धावा २००* - जोस बटलर ( २०२२)१९० - डेव्हिड वॉर्नर ( २०१६) १७० - रजत पाटीदार ( २०२२)१५६ - मुरली विजय ( २०१२) १५६ - वृद्धीमान साहा ( २०१४)