Join us  

Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : जोस बटरलने David Warner चा मोठा विक्रम मोडला, थेट विराट कोहलीच्या पंक्तित जाऊन बसला 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 9:03 PM

Open in App

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. चौथ्या षटकात यशस्वीने खणखणीत षटकात खेचला, परंतु पुन्हा तोच फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. यश दयालने गुजरातला पहिले यश मिळवून देताना १६ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या यशस्वीला माघारी पाठवले.अल्झारी जोसेफच्या जागी आज प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या ल्युकी फर्ग्युसनने ( Lockie Ferguson ) बटलरला भन्नाट यॉर्कर टाकून विक्रम नोंदवला. आयपीएल २०२२मधील त्याने सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याच्या चेंडूचा वेग हा १५७.३ kmph एवढा होता. त्याने १४ वेळा सर्वाधिक जलद चेंडू टाकणाऱ्या उम्रान मलिकचा ( १५७ kmph) विक्रम मोडला.  

९व्या षटकात हार्दिक पांड्याने गुजरातला मोठी विकेट मिळवून दिली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन १४ धावा करून माघारी परतला. साई किशोरनचे दुसरी कॅच घेतली. हार्दिकने त्या षटकात १ धाव देत १ विकेट घेतली. आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत फक्त कर्णधार अनिल कुंबळेला विकेट घेता आली होती. आज हार्दिक पांड्याने त्या पंक्तित स्थान पटकावले. राजस्थानवर दडपण निर्माण करण्यासाठी हार्दिकने चेंडू पुन्हा शमीकडे दिला, परंतु बटलरने त्या षटकात ११ धावा चोपून आणखी एक विक्रम नावावर केला. आयपीएलच्या एका पर्वात ८५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर पहिलाच फलंदाज ठरला. त्याने डेव्हिड वॉर्नरने २०१६मध्ये नोंदवलेला ८४८ धावांचा विक्रम मोडला. ( Jos Buttler becomes the 2nd batsman in history to score 850+ runs in an IPL season.) विराटने एका पर्वात ९७३ धावा केल्या होत्या. 

पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जोसने तिसरे स्थान पटकावताना लोकेश राहुलला मागे टाकले. या विक्रमात डेव्हिड वॉर्नर ४६७ धावांसह ( २०१६) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अॅडम गिलख्रिस्ट ( ३८२), जोस बटलर ( ३७४), लोकेश राहुल ( ३६४) व गौतम गंभीर  ( ३५७) असा क्रम येतो. ( IPL 2022 Finals RR vs GT सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सडेव्हिड वॉर्नर
Open in App