Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर नताशा स्टँकोव्हिचला झाले अश्रू अनावर, हार्दिक पांड्याला दिली 'झप्पी', Video 

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:29 AM2022-05-30T00:29:33+5:302022-05-30T00:30:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Natasa Stankovic breaks down after meeting husband Hardik Pandya post Gujarat Titans’ title win in Ahmedabad, Video   | Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर नताशा स्टँकोव्हिचला झाले अश्रू अनावर, हार्दिक पांड्याला दिली 'झप्पी', Video 

Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर नताशा स्टँकोव्हिचला झाले अश्रू अनावर, हार्दिक पांड्याला दिली 'झप्पी', Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. दोन जीवदान मिळालेल्या शुबमन गिलने ( Shubman Gill) नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि डेव्हिड मिलरने १९ चेंडूंत नाबाद ३२ धावा करून गुजरातचा विजय निश्चित केला. या विजयानंतर हार्दिकची पत्नी नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic) भावनिक झाली आणि मैदानावर धाव घेत तिने पतीला घट्ट मिठी मारली... 

रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम

गुजरात टायटन्सने १३१ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत सहज पार केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून  यशस्वी जैस्वाल ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २)  हे झटपट बाद झाले. जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या.  शिमरोन हेटमायर ( ११), आर अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) व रियान पराग ( १५) हे फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याने १७ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. 


प्रत्युत्तरात शुबमन गिलला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. वृद्धीमान साहा ( ५) व मॅथ्यू वेड ( ८) माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या व शुबमन यांन ५३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून गुजरातसाठी पाया सेट केला. त्यानंतर शुबमन व डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागीदारी करून गुजरातचा ७ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय पक्का केला. गिल ४३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने १९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. 

 राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video

या विजयानंतर नताशा भावनिक झालेली पाहायला मिळाली.

Web Title: IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Natasa Stankovic breaks down after meeting husband Hardik Pandya post Gujarat Titans’ title win in Ahmedabad, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.