IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस; गुजरात टायटन्सला हवा होता तोच निर्णय घेतला, हार्दिकने एक बदल केला 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:35 PM2022-05-29T19:35:12+5:302022-05-29T19:38:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first, one change in Gujarat Titans playing Xi | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस; गुजरात टायटन्सला हवा होता तोच निर्णय घेतला, हार्दिकने एक बदल केला 

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस; गुजरात टायटन्सला हवा होता तोच निर्णय घेतला, हार्दिकने एक बदल केला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. समारोप समारंभात बॉलिवूड सुपर स्टार रणवीर सिंग आणि ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए आर रेहमान यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने नरेंद्र मोदी स्टेडियम दणाणून सोडले. १ लाख ३० हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे आणि ही पण  विक्रमी उपस्थिती आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती, असे नाणेफेकीनंतर सांगितले.


आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली दिमाखदार कामगिरी करून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. सुरुवातीपासून स्पर्धेतही नसलेल्या राजस्थानने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली कमाल केली. त्यामुळे आज RR जिंकल्यास संजू आयपीएल चषक उंचावणारा दुसरा युवा कर्णधार ठरेल अन् जर GT जिंकल्यास सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन्ही विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहेत.

वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, राहुल तेवातिया, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, राशिद खान, यश दयाल आदी खेळाडूंच्या जोरावर गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी गटात त्यांनी सर्वाधिक २० गुणांची कमाई केली आणि क्वालिफायर १ मध्ये राजस्थानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानने सर्व क्रिकेट पंडितांची भविष्यवाणी चुकवली अन् फायनल गाठली. जोस बटलर हा राजस्थानचा नायक आहे. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय आदींनी त्यांची कामगिरी  चोख बचावून संघाच्या प्रवासात मोलाचा वाटा उचलला.

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युजवेंद्र चहल ( Rajasthan Royals XI: Yashasvi Jaiswal, Jos Buttler, Sanju Samson(w/c), Devdutt Padikkal, Shimron Hetmyer, Riyan Parag, Ravichandran Ashwin, Trent Boult, Prasidh Krishna, Obed McCoy, Yuzvendra Chahal)

गुजरात टायटन्स - वृद्धीमान साहा, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, साई किशोर, ल्युकी फर्ग्युसन ( अल्झारी जोसेफच्या जागी संघात), यश दयाल, मोहम्मद शमी ( Gujarat Titans XI: Wriddhiman Saha(w), Shubman Gill, Matthew Wade, Hardik Pandya(c), David Miller, Rahul Tewatia, Rashid Khan, Ravisrinivasan Sai Kishore, Lockie Ferguson, Yash Dayal, Mohammed Shami ) 

Web Title: IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first, one change in Gujarat Titans playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.