Join us  

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : बीसीसीआयने Guinness Book of World Records मध्ये नोंदवला जाईल असा पराक्रम केला

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 7:01 PM

Open in App

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. आयपीएल २०२२मध्ये नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली दिमाखदार कामगिरी करून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. तर सुरुवातीपासून स्पर्धेतही नसलेल्या राजस्थानने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली कमाल केली. त्यामुळे आज RR जिंकल्यास संजू आयपीएल चषक उंचावणारा दुसरा युवा कर्णधार ठरेल अन् जर GT जिंकल्यास सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन्ही विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहेत.

  • आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स - ड्वेन ब्राव्हो ( १८३), लसिथ मलिंगा ( १७०), अमित मिश्रा ( १६६), युजवेंद्र चहल ( १६५), पियूष चावला ( १५७), आर अश्विन ( १५७). 
  • आयपीएल फायनलमधील सर्वोत्तम गोलंदाजी - अनिल कुंबळे ( ४-१६ वि. डेक्कन चार्जर्स, २००९), ड्वेन ब्राव्हो ( ४-५४ कोलकाता नाईट रायडर्स, २०१३),  करनवीर सिंग ( ४-५४ वि. कोलकाता नाईट रायडर्स, २०१४),  आर अश्विन ( ३-१६ वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०११),  युसूफ पठाण ( ३-२२ वि. चेन्नई सुपर किंग्स, २००८).
  • आयपीएल फायनलमध्ये एकूण सर्वाधिक विकेट्स - ड्वेन ब्राव्हो ( १०), मिचेल जॉन्सन ( ७), एल्बी मॉर्केल ( ६), शार्दूल ठाकूर ( ६), लसिथ मलिंगा ( ५)  
  • आयपीएल फायनलमध्ये एकूण सर्वाधिक धावा - सुरेश रैना ( २४९), शेन वॉटसन ( २३६), रोहित शर्मा ( १८३), मुरली विजय ( १८१), महेंद्रसिंग धोनी ( १८०), किरॉन पोलार्ड ( १८०).

  • या सामन्याच्या समारोप समारंभाआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जगातील सर्वात मोठी जर्सी आणली आणि Guinness Book of World Records मध्ये त्याची नोंद झाली. आजचा सामना पाहण्यासाठी १ लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. या जर्सीवर सर्व १० संघांचे लोगो आहेत आणि 15 years of IPLअसे लिहिले गेले आहे. ६६ मीटर लांब आणि ४२ मीटर रुंद ही जर्सी आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सनरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App