Join us  

Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सचे धाबे दणाणून सोडले, १७ धावांत ३ मोठे फलंदाज बाद केले, Video 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या ( RR) पथ्यावर पडला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 9:28 PM

Open in App

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या ( RR) पथ्यावर पडला नाही. GT चा कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेतलाच, शिवाय त्यानेही भन्नाट स्पेल टाकून संजू  सॅमसन व जोस बटलर या दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. हार्दिकने १४४ च्या वेगाने बाऊन्सर फेकून राजस्थानच्या फलंदाजांना हतबल केले. हार्दिकने फायलनसाठी जणू एनर्जी वाचवली होती, असेच दिसले. हार्दिकने त्याच्या चौथ्या षटकात शिमरोन हेटमायरची विकेट घेतली. त्याने ४ षटकांत १७ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. 

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. चौथ्या षटकात यशस्वी ( २२) झेलबाद झाला. ९व्या षटकात हार्दिक पांड्याने गुजरातला मोठी विकेट मिळवून दिली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन १४ धावा करून माघारी परतला. साई किशोरनचे दुसरी कॅच घेतली. हार्दिकने त्या षटकात १ धाव देत १ विकेट घेतली. आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत फक्त कर्णधार अनिल कुंबळेला विकेट घेता आली होती. आज हार्दिक पांड्याने त्या पंक्तित स्थान पटकावले. राजस्थानवर दडपण निर्माण करण्यासाठी हार्दिकने चेंडू पुन्हा शमीकडे दिला, परंतु बटलरने त्या षटकात ११ धावा चोपून आणखी एक विक्रम नावावर केला. 

आयपीएलच्या एका पर्वात ८५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर पहिलाच फलंदाज ठरला. त्याने डेव्हिड वॉर्नरने २०१६मध्ये नोंदवलेला ८४८ धावांचा विक्रम मोडला. विराटने एका पर्वात ९७३ धावा केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जोसने तिसरे स्थान पटकावताना लोकेश राहुलला मागे टाकले. या विक्रमात डेव्हिड वॉर्नर ४६७ धावांसह ( २०१६) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अॅडम गिलख्रिस्ट ( ३८२), जोस बटलर ( ३७४), लोकेश राहुल ( ३६४) व गौतम गंभीर ( ३५७) असा क्रम येतो. १२व्या षटकात राशिद खानने RRच्या देवदत्त पडिक्कलला ( २) बाद केले आणि पुढच्याच षटकात हार्दिकने महत्त्वाची विकेट घेतली. जोस बटलर ३५  चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३९ धावांवर बाद झाला. बटलरने आयपीएल २०२२त ४ शतकं व ४ अर्धशतकासह ८६३ धावा केल्या.   ( IPL 2022 Finals RR vs GT सामन्याचा धावफलक एका क्लिकवर)

हार्दिक पांड्याने घेतलेली विकेट पाहा... 

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्याजोस बटलरसंजू सॅमसनगुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्स
Open in App