IPL 2022: आयपीएलच्या(IPL-2022) 15व्या सीझनची दमदार सुरुवात झाली. यंदाच्या मोसमात दोन नवीन संघ सामील झाले. हे दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान, आयपीएलचा सर्वात यशस्वी आणि 5 वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अतिशय वाईट अवस्था झाली आहे. मुंबईला सलग 6 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याचा अर्थ आता मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.
'मुंबईने संघात बदल करावा'दरम्यान, भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin) यांनी मुंबई संघ व्यवस्थापनाला संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. क्रिकेट वेबसाइट क्रिकट्रॅकरवर आयोजित 'नॉट जस्ट क्रिकेट' या टॉक शोमध्ये अझहर म्हणाले की, "मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा. अर्जुन तेंडुलकरला संघात घेण्याची हीच वेळ आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. तेंडुलकर आडनाव जोडल्याने संघाचे नशीब बदलेल," असे अझहर म्हणाले.
'नवीन खेळाडूला संधी देण्याची गरज'अझहर पुढे म्हणाले की, ''तुम्ही टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले, पण अद्यात खेळण्याची संधीच दिली नाही. ही नक्कीच आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही त्याला संधी देत नसाल, तर मग त्याचा संघात समावेश करण्याचा फायदा काय? चांगल्या खेळाडूंना तुम्ही बेंचवर बसवत आहात. गोष्टी तुमच्यानुसार होत नसतील तर ते वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावून पाहण्याची हीच वेळ आहे," असेही अझहर म्हणाले.
पुढचा सामना CSK सोबतमुंबईचा पुढचा सामना 21 एप्रिलला चेन्ना सुपर किंग्स(CSK) विरुद्ध होणार आहे. या मोसमात सीएसके आणि मुंबईची कामगिरी जवळपास सारखीच आहे. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत, पण यंदाच्या मोसमात दोन्ही संघाने अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे.