स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या एबी डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून(RCB) आयपीएलमध्ये 10 वर्षे खेळलेल्या डिव्हिलियर्सने चाहत्यांना खूशखबर दिली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या मोसमात डिव्हिलियर्स दिसू शकतो. त्याने या स्पर्धेत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबीडीने संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने खूप काही दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा या संघांसाठी काही महत्वाची भूमिका बजावायला आवडेल. गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक तरुणांनी मोठी कामगिरी करुन दाखवली. त्यामुळे मला तरुणांसाठी काहीतरी करायला आवडेल.
भविष्यातील योजना सांगिले
आयपीएलमध्ये 184 सामने खेळलेला डिव्हिलियर्स म्हणाला, “मला वाटते की, मला दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी काहीतरी करायचे आहे. पुढे काय होईल माहीत नाही पण मी प्रयत्न करेन. मी गेल्या काही वर्षांपासून तरुणांना मदत करत आहे आणि त्यांना सतत सल्ले देत आहे.”
RCBच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसू शकतो एबीडी
डिव्हिलियर्स पुढे म्हणाले की, काय होईल कुणालाच माहीत नाही. जेव्हा मी भविष्यात मागे वळून पाहीन तेव्हा मला आनंद होईल की मी काही खेळाडूंच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. माझे लक्ष सध्या खेळाडूंना शक्य तितकी मदत करण्यावर आहे. डिव्हिलियर्सच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांचा असा अंदाज आहे की डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये आरसीबीला मदत करताना दिसू शकतो.
Web Title: IPL 2022: Good news for RCB fans! AB de Villiers may comeback in RCB team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.