IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातली लढत चुरशीची झाली. KKRचा आंद्रे रसेलने २०व्या षटकात चार विकेट्स घेत GTला आधीच धक्के दिले होते. त्यात फलंदाजीतही कमाल दाखवताना गुजरातच्या ताफ्यात तणावाचे वातावरण निर्माण केले होते. अखेरच्या षटकात विजयासाठी १८ धावा हव्या असताना रसेलने पहिला चेंडू षटकार खेचला. मात्र पुढच्याच चेंडूवर ल्युकी फर्ग्युसनने ( Lockie Ferguson ) ने अफलातून झेल घेत सामनाच फिरवला. गुजरातने ८ धावांनी विजय मिळवला आणि यासह ते १२ गुणांसह टेबल टॉपर ठरले.
१५६ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले. नितीश राणा ( २) काहीच कमाल दाखवू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांनी KKR चा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यश दयालने GT ला मोठे यश मिळवून देताना अय्यरला ( १२) बाद केले. त्यापाठोपाठ त्याने रिंकू सिंगचाही ( ३५) अडथळा दूर केला. १३व्या षटकात यश दयालने KKRच्या आंद्रे रसेलची विकेट मिळवलीच होती, परंतु दुर्दैवाने तो No Ball ठरला. रसेलला १० धावांवर जीवदान मिळाले.
रसेलने वेंकटेश अय्यरसह डाव सावण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनव मनोहरने अफलातून झेल घेत ही जोडी तोडली. राशिद खानच्या गोलंदाजीवर वेंकटेशने मारलेला फटका मनोहरने सीमारेषेवर टिपला. राशिदचे ही आयपीएलमधील १००वी विकेट ठरली आणि सर्वात कमी ८३ डावांत १०० विकेट्स घेणाऱ्या अमित मिश्राच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. शिवम मावीलाही ( २) राशिदने त्रिफळाचीत केले. आंद्रे रसेलने विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. त्याने २५ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ल्युकी फर्ग्युसनने अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले. त्यानंतर गुजरातने ८ धावांनी विजय मिळवला. KKR ला ८ बाद १४८ धावा करता आल्या.
गुजरात टायटन्सचा डाव हार्दिक पांड्याने सावरला...
सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा (२५) व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर ( २७) व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान ( ०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची ( १७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर भन्नाट कॅच घेत आंद्रेने गुजरातची वाट लावली. त्याने २०व्या षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. गुजरातला ९ बाद १५६ धावा करता आल्या.
Web Title: IPL 2022 GT vs KKR Live Updates : Andre Russell - 4/5 with the ball in 1 over and now 48 in 25 balls, Lockie Ferguson takes the important catch and Gujarat Titans won by 8 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.