IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS Live Updates : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) च्या एकाकी संघर्षाच्या जोरावर गुजरात टायटन्सने ९ बाद १५६ धावांचा आव्हानात्मक पल्ला गाठला. टीम साऊदीने तीन विकेट्स घेत गुजरातला आधीच धक्के दिले होते. त्यात आंद्रे रसेलने ( Andre Russell) २०व्या षटकाच्या पहिल्या दोन व शेवटच्या दोन चेंडूंवर विकेट्स घेत इतिहास रचला. प्रत्युत्तलात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन फलंदाज तीन षटकांत माघारी परतले आणि हार्दिकची पत्नी नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic ) हिला आनंद आवरता आला नाही. सुनील नरीनच्या विकेटनंतर तर तिने चक्क डान्सच करायला सुरूवात केली.
सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा (२५) व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर ( २७) व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान ( ०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने राहुल तेवातियाची ( १७) विकेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर भन्नाट कॅच घेत आंद्रेने गुजरातची वाट लावली. त्याने २०व्या षटकात ५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. गुजरातला ९ बाद १५६ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर लगेच माघारी परतले. सॅम बिलिंग्स ( ४) व सुनील नरीन ( ५) यांना मोहम्मद शमीने माघारी पाठवले.